Join us

मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, निखिल राऊत येणार 'या' सिनेमात एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 5:48 PM

'फर्जंद' चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर दिग्दर्शक दिगपाल लांजेकर आता इतिहासातलं एक सोनेरी पान उलगडू पाहत आहेत.

ठळक मुद्देत्तेशिकस्त' हा चित्रपट शिवाजी महाराजांनी फत्ते एका थरारक गनिमी काव्यावर आधारित आहे

'फर्जंद' चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर दिग्दर्शक दिगपाल लांजेकर आता इतिहासातलं एक सोनेरी पान उलगडू पाहत आहेत. युवा पिढीला आपल्या अलौकिक इतिहासाचा उलगडा व्हावा म्हणून आकारास आलेल्या 'फर्जंद'ने तिकीटबारीचे मैदान मारत हाऊसफुल्लची यशस्वी मोहोर उमटवली होती. 'फर्जंद' नंतर आत्ता छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुशल युद्धनीतीचे दर्शन घडविणारा 'फत्तेशिकस्त' लवकरच इतिहासप्रेमींच्या भेटीस येणार असून पन्हाळगडावर कलाकारांच्या उपस्थितीत नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला आहे आणि लगेचच चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. कुशाग्र बुद्धिमत्ता, भौगोलिक तथा मानसशास्त्रीय उत्तम समज, दूरदृष्टी, कालसुसंगत युद्धनीती यांच्या बळावर महाराजांनी भल्या-भल्या शत्रूंवर मोठ्या चलाखीने चढाया केल्या आणि प्रत्येक मोहिम फत्ते केली. आलमंड्स क्रिएशन्स प्रस्तुत 'फत्तेशिकस्त' हा चित्रपट शिवाजी महाराजांनी फत्ते केलेल्या अशाच एका थरारक गनिमी काव्यावर आधारित आहे. अलीकडेच भारतीय लष्कराने केलेल्या थरारक सर्जिकल स्ट्राईकची पाळंमुळं ही शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीमध्येच रुजलेली आहेत, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. 'फत्तेशिकस्त' या आगामी महत्त्वाकांक्षी चित्रपटाद्वारा आपल्याला अशाच एका अतुलनीय लढ्याचे साक्षीदार होण्याची संधी लाभणार आहे.

 मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, निखिल राऊत, हरीश दुधाडे, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, नक्षत्रा मेढेकर यांसारख्या मातब्बर कलाकारांची भट्टी 'फत्तेशिकस्त'च्या निमित्ताने पुन्हा एकदा जुळून आली आहे. शिवाय हिंदी चित्रपट-मालिकांमधील प्रसिद्ध चेहरा अनुप सोनी सुद्धा या चित्रपटाद्वारे मराठी मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

असं म्हणतात की सुकर भविष्यासाठी भूतकाळाची पानं उलगडणं गरजेची असतात. इतिहास हा असा दुवा आहे जो आपल्याला तत्कालीन घटनांशी जोडून ठेवतो, आणि हा दैदिप्यमान इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या अजरामर पराक्रमाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. अशाच एका शिवकालीन रोमांचकारी सर्जिकल स्ट्राईकची आठवण करून देणारा 'फत्तेशिकस्त' आपल्या भेटीला येण्यासाठी सज्ज होतोय.

टॅग्स :मृणाल कुलकर्णीनिखिल राऊत