थोर क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा नुकताच रिलीज झाला. रणदीप हुड्डाने (Randeep Hooda) सिनेमात मुख्य भूमिका साकारली. सिनेमाचं आणि त्याच्या अभिनयाचं विशेष कौतुक होत आहे. मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी सिनेमा पाहून प्रभावित झाले आहेत. वीर सावरकरांनी इंग्रजांना धडा शिकवण्यासाची जे केलं त्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यांच्यावर झालेला अन्याय सिनेमा पाहून नक्कीच जाणवतो. सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम गायिका मुग्धा वैशंपायन (Mugdha Vishampayan) हिने केलेली पोस्ट चर्चेत आहे.
मुग्धा वैशंपायनने स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमा पाहिल्यावर पोस्ट शेअर केली. ती लिहिते,'स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या तेजस्वी सूर्याचं आयुष्य अवघ्या जगाला कळावं, त्यांनी आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाने आपल्या मातृभूमीसाठी केलेला त्याग, त्यांच्यावर झालेला अन्याय, त्यांचं देशकार्य संपूर्ण जगाला कळावं अशी गेले अनेक वर्ष खूप कळकळीची, तळमळीची इच्छा होती. आज या चित्रपटाच्या रुपाने सावरकर आणि त्यांचं 'खरं' कार्य, त्यांच्यावर झालेला अन्याय, हे सगळं संपूर्ण जगभरात अधिकाधिक पोहोचतंय याचा किती आनंद, अभिमान, समाधान वाटतंय काय सांगू! एका सावरकरभक्तासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे. रणदीप हुड्डा तुझे आभार मानावे तेवढे कमीच. वंदे मातरम!"
दरवर्षी अंदमान बोलावतंय ही यात्रा आयोजित होते. या यात्रेत पार्थ बावस्कर यांचं व्याख्यान, अंदमानचं सौंदर्य दर्शन, वीर सावरकरांचं काम पोहोचवणं आणि मुग्धाची गाण्यांची मैफील हे सर्व प्रेक्षकांना अनुभवायला मिळतं. त्यामुळे मुग्धाची सावरकर भक्ती यातून दिसून येते. आता हा सिनेमा पाहूनही ती प्रभावित झाली आहे आणि इतरांनाही आवर्जुन पाहा असं आवाहन तिने केलं आहे.