Join us

प्रथमेश लघाटेला मुग्धाने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, अरिजित सिंगचं गाणं ठेवत म्हणाली, 'माय...'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 12:12 PM

प्रथमेशच्या वाढदिवसाला मुग्धाने दिल्या गोड शुभेच्छा

मराठी कलाविश्वातील सध्याचं चर्चेतलं कपल प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) आणि मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan). दोघांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली आणि सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातला. सारेगमप लिटील चॅम्प्सचा मोदक आणि सर्वांची लाडकी मॉनिटर एकमेकांच्या प्रेमात आहेत म्हणल्यावर सर्वांनाच अत्यानंद झाला. आज प्रथमेशचा वाढदिवस असल्याने मुग्धाने छान फोटो पोस्ट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 

प्रथमेश आज त्याचा २८ वा वाढदिवस साजरा करतोय. आज सगळेच त्याला शुभेच्छा देत आहेत. आयुष्यातील खास व्यक्ती मुग्धानेही त्याच्यासाठी पोस्ट शेअर केली आहे. 'तेरे हवाले' हे अरिजित सिंगचं गाणं बॅकग्राऊंडला लावत तिने प्रथमेशला शुभेच्छा दिल्या. मुग्धा लिहिते,'हॅपी बर्थडे माय मॅन'. 

मुग्धाची पोस्ट शेअर करत प्रथमेशने तिला 'थँक्यू मुग्गा' असं म्हटलं आहे. नुकतंच प्रथमेश आणि मुग्धा गाण्याच्या कार्यक्रमासाठी एकत्र गोव्याला गेले होते. तिथे त्यांनी देवदर्शन घेतले. तसंच लाँग ड्राईव्हला गेले. या सगळ्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले. दोघंही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. सध्या गाण्याच्या कार्यक्रमांमुळे त्यांचं शेड्युल व्यस्त आहे. डिसेंबरमध्ये त्यांचं लग्न होईल अशी शक्यता आहे. तर मुग्धाची बहीण मृदुल त्याआधी लग्नबंधनात अडकणार आहे.

टॅग्स :सा रे ग म पटेलिव्हिजनरिलेशनशिपदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट