Join us

Ira Khan Wedding : आमिरच्या लेकीच्या लग्नात मुकेश-नीता अंबानींनी वेधलं सगळ्यांचं लक्ष, 'तो' व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 11:06 IST

सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनीही आमिर खानच्या लेकीच्या लग्नात हजेरी लावली होती.

बॉलिवूड अभिनेका आमिर खानची लेक आयरा खान नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. आयराने बॉयफ्रेंड नुपूर शिखरेशी कोर्ट मॅरेज पद्धतीने लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थित आयरा-नुपूरचा विवाहसोहळा संपन्न झाला. त्यांच्या लग्नातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

आमिरच्या लेकीच्या लग्नात अनेक सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनीही आमिर खानच्या लेकीच्या लग्नात हजेरी लावली होती. आयरा खानच्या लग्नातील मुकेश आणि नीता अंबानींचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत आमिर खान मुकेश अंबानी आणि नीता अंबानींचं स्वागत करताना दिसत आहे. आयराच्या लग्नातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

आयरा आणि नुपूर गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. मे महिन्यात त्यांचा साखरपुडा झाला होता. आता कोर्ट मॅरेज पद्धतीने लग्न उरकत ते आयुष्यभरासाठी एकमेकांचे जोडीदार झाले आहेत. लग्नानंतर त्यांचा रिसेप्शन सोहळाही पार पडणार आहे. नुपूर एक फिटनेस ट्रेनर आहे. अनेक सेलिब्रिटींचा तो फिटनेस ट्रेनर होता. 

टॅग्स :इरा खानआमिर खानमुकेश अंबानीनीता अंबानी