मुक्ता बर्वे आणि उमेश कामत यांची ‘अजूनही बरसात आहे’ ही नवीकोरी मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. आपणही जर या एव्हरग्रीन जोडीचे फॅन असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची, पण तितकीच धक्का देणारी बातमी आहे. उत्तमोत्तम ऑडिओ कन्टेन्ट निर्माण करणाऱ्या ‘स्टोरीटेल मराठी’ या जगविख्यात प्लॅटफॉर्मने खास नव्याने तयार केलेल्या ‘६१ मिनिट्स’ या ओरिजिनल ऑडिओ ड्रामामध्ये मुक्ता आणि उमेश एका वेगळ्याच रूपात आपल्यासमोर आले आहेत आणि त्यांच्याबरोबरीने असणार आहेत ओंकार गोवर्धन, समीर पाटील आणि रोहित कोकाटे हे कसलेले कलाकार.६१ मिनिट्सची कथा अपहरणाभोवती फिरते. मयूर, निशा, स्वानंद आणि आवारे सर या चौघांनी किडनॅप होतील याचा विचार कधी केलाच नव्हता. म्हणूनच ते अशा खोलीत प्रत्यक्षात सापडल्यानंतर पुरते हबकले आहेत. त्यात त्यांना तिथे कोणी किडनॅप करून आणलंय, त्यामागचं कारण काय, त्या किडनॅपरला हवंय काय हेही कोणी सांगत नाहीये. डोळ्यांत बोट घातलं तरी दिसणार नाही अश्या ठार अंधारात अखेर स्पीकरवरून एक घोषणा दिली जाते, ज्यात त्यांना एक कोडं घातलं जातं, जे त्यांच्याच पूर्वायुष्याशी निगडित आहे. ते सोडवणं हाच त्या चौघांपुढे एकमेव पर्याय उरतो अन् सुरू होतं एक थरारनाट्य..! ते कोडं त्यांना सुटतं का? ६१ मिनिटांचं नक्की काय महत्त्व आहे? त्या चौघांना तिथे का आणलं गेलंय? तो किडनॅपर कोण आहे? त्याला नक्की काय हवंय? या सर्व प्रश्नांची उत्तरं म्हणजेच ‘६१ मिनिट्स’ हा स्टोरीटेल मराठीचा ऑडिओ ड्रामा..!
मुक्ता बर्वे आणि उमेश कामतची '६१ मिनिट्स', जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 3:22 PM