Aryan Khan Drug Case : गेल्या 26 दिवसांपासून बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान (Shah Rukh Khan) तहान-भूक विसरला होता. ना डोळ्याला झोप होती, ना चेहऱ्यावर हास्य. मुलगा आर्यन खान (Aryan Khan) तुरुंगात असल्यावर बाप म्हणून त्याची वेगळी अशी काय अवस्था असणार? अखेर काल 28 ऑक्टोबरला आर्यनला जामीन मिळाला आणि शाहरूखच्या चेहऱ्यावर तब्बल 26 दिवसानंतर हास्य परतलं. तो भावूक झाला. इतका की, त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. बॉम्बे हायकोर्टात आर्यनची केस लढणारे माजी अॅटर्नी जनरल मुकूल रोहतगी यांनी शाहरूखला मुलासाठी तडफडतांना पाहिले.
एनडीटीव्हीला दिलेल्या ताज्या मुलाखतीत मुकूल यांनी शाहरूखची अवस्था सांगितली. ते म्हणाले, गेल्या चार पाच दिवसांपासून शाहरूख अक्षरश: वेदनांनी तडफडावं तसा तडफडत होता. तो ठीक जेवतही नव्हता. तो आतूर कमालीचा हादरलेला होता आणि फक्त कॉफीचे घोट पोटात रिचवत होता. आर्यनला जामीन मिळाला आणि शाहरूखच्या चेहऱ्यावर मला कमालीची शांतता दिसली. एक बाप म्हणून त्याच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते.क्रूझ ड्रग्स प्रकरणात आर्यन खान आर्थर रोड तुरुंगात होता. मुलगा तुरुंगात बंद होता आणि इकडे शाहरूख व त्याची पत्नी गौरी खान यांची अवस्था अत्यंत वाईट होती. आर्यन घरी येत नाही तोपर्यंत ‘मन्नत’वर काहीही गोड बनणार नाही, असा नवस गौरीनं बोलला होता. आई-बाप म्हणून दोघंही अगतिक होते. अर्थात त्यांनी हिंमत सोडली नाही. या कठीण काळात ते एकमेकांचा आधार बनून राहिले.
शाहरूख व गौरी यांनी आर्यनच्या कोर्टातील कोणत्याही सुनावणीला हजेरी लावली नाही. पण मुकूल रोहतगी यांनी सांगितल्यानुसार, शाहरूखचे सुनावणीकडे अगदी बारीक लक्ष होते. आपल्या लीगल टीमसोबत बसून तो नोट्स घ्यायचा. आर्यन तुरुंगात गेल्यापासून शाहरूखने सर्व शूटींग रद्द केली होती. 21 ऑक्टोबरला तो आर्यनला भेटायला आर्थर रोड तुरुंगातही गेला होता. यावेळी तो आर्यनसोबत इंटरकॉमवर सुमारे 15-20 मिनिटं बोलला होता.येत्या 2 तारखेला शाहरूखचा वाढदिवस आहे आणि 4 तारखेची दिवाळी. यावेळी आर्यन सोबत असणार याचा शाहरूख व गौरीला विशेष आनंद आहे.