बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला प्रकरणाचा छडा अद्याप लागलेला नाही. याउलट हे प्रकरण आणखी गुंतत चाललं आहे. अभिनेत्री संजना सांघीची पोलिसांनी मंगळवारी 9 तास चौकशी केली आहे. मुंबई पोलिसांनी निर्माता-दिग्दर्शक शेखर कपूर यांना नोटीस पाठवली आहे. त्यांना आपला जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात येणार आहे. शेखर कपूर सुशांतच्या 'पानी' सिनेमाचे दिग्दर्शन करणार होते.
सुशांतच्या आत्महत्येनंतर शेखर कपूर यांनी एक ट्विट केले होते की, तू ज्या दु:खातून जात होता त्याची मला जाणीव होती. ज्या लोकांनी तुला कमकुवत केले, ज्यांच्यामुळे तू माझ्या खांद्यावर डोकं ठेऊन अनेकदा अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. त्यांची कहाणी मला माहिती आहे. जर मी मागील ६ महिने तुझ्यासोबत असतो, आपलं बोलणं झालं असतं. जे काही झालं त्यात तुझा दोष नाही तर त्यांचे कर्म होते. शेखर कपूर यांच्या पोस्टचा इशारा अनेकांकडे जातो. बॉलिवूडमध्येही चर्चा आहे की, सुशांतला टॉपच्या दिग्दर्शकांकडून काम दिलं जात नसल्याने तो हताश होता. काही मोठ्या बॅनर्ससोबत काम करतानाही सुशांतवर बंदी आणली होती. पण या केवळ चर्चा आहेत याचे पुरावे कुणाकडेच नाही.