सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या थैमानाने हैराण झाले आहे. देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. अशा संकटकाळात अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी गरजूंना मदतीचा हात दिला आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी आता मुंबई पोलिसांच्या मदतीला धावून आला आहे.
कोरोना व्हायरसविरोधात लढण्यसाठी मुंबई पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. या ऑन ड्युटी पोलिसांसाठी रोहित शेट्टीने तब्बल आठ हॉटेल्सची व्यवस्था केली आहे. ज्या हॉटेल्सवर जाऊन ऑन ड्युटी पोलिस थोडा आराम करु शकतात. या हॉटेल्समध्ये पोलिसांच्या नाश्ता आणि जेवणाची सोयसुद्धा रोहितने केली आहे. मुंबई पोलिसांनी ट्विट करत रोहित शेट्टीचे आभार मानले आहेत. सध्या रोहित शेट्टीने केलेल्या कामाबाबत त्याचे सर्वस स्तरांतून कौतूक करण्यात येते आहे. याआधी ही रोहितने 'फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज'ला 51 लाखांची मदत केली आहे.