'सडक 2' आणि 'बाटला हाऊस' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या अभिनेत्री क्रिसॅन परेराविषयी एक बातमी आली, ज्याने सर्वांनाच हादरवले. क्रिसॅन परेरा हिला यूएई पोलिसांनी यापूर्वी ड्रग्स तस्करी प्रकरणी अटक केली होती. मात्र, या प्रकरणानंतर अभिनेत्रीची तुरुंगातून सुटका झाली. आता या प्रकरणात अभिनेत्रीला गोवणाऱ्यांविरोधात मुंबईत आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची बातमी समोर येत आहे.
सुमारे एक महिना ती दुबईच्या शारजाह जेलमध्ये होती. अभिनेत्रीला ड्रग्जच्या गंभीर प्रकरणात अडकवण्यात आलं होतं.1 एप्रिल रोजी शारजाह विमानतळावर क्रिसॅनला अटक करण्यात आली होती, त्यानंतर कुटुंबीयांनी अभिनेत्रीला सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.
क्रिसॅनला ड्र्ग तस्करी प्रकरणात फसवणारे मुंबईचे रहिवासी एंथनी पॉल आणि राजेश बोभाटे अटक करण्यात आली होती. पॉल आणि राजेश बोभाटे उर्फ रवी या दोन आरोपींविरुद्ध गुन्हे शाखेने मुंबई न्यायालयात १५१४ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे की, अटक केलेले आरोपी अंमली पदार्थांच्या तस्करीत अडकून लोकांकडून पैसे उकळायचे.
श्वान भुंकला म्हणून बदला घेण्यासाठी बोरीवलीतील बेकर्सने ‘अभिनेत्री क्रिसॅन परेराला हॉलिवूड वेब सीरिजच्या ऑडिशनच्या नावाखाली ‘गुमराह’ चित्रपटासारखे खोट्या ड्रग्ज केसमध्ये अडकविल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे होती. लॉकडाऊन दरम्यान क्रिसॅनचा पाळीव श्वान पॉलवर भुंकला आणि त्याला चावण्याचा प्रयत्न केला. पॉलने त्यांच्या श्वानाला मारण्यासाठी खुर्ची उचलली. तेव्हा क्रिसॅनची आई प्रेमिला यांना राग आला, त्यांनी त्याला सुनावले. सर्वांसमोर पॉलचा अपमान झाला. याच रागातून त्याने बदला घेण्याचे ठरविल्याचेही समोर आले.
पॉल कोण आहे?मीरा रोडचा रहिवासी असलेला पॉल हा मालाड, बोरीवली भागात बेकरी चालवतो. तर रवी हा कोकणातील रहिवासी असून एका बँकेत सहायक व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. पॉलची बहीण प्रेमिला यांच्या इमारतीत राहते.