माय डिअर आर्यन..., हृतिक रोशनने आर्यन खानसाठी लिहिली खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 02:50 PM2021-10-07T14:50:55+5:302021-10-07T15:09:25+5:30
Mumbai Rave Party Drugs Case : स्वत:वर विश्वास ठेव,आम्ही तुझ्यासोबत आहोत...; हृतिकची पोस्ट आर्यनसाठी पण प्रत्येक तरूणाने वाचावी अशी...
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरणी (Mumbai Rave Party Drugs Case ) अटक झाली आणि सगळीकडे खळबळ माजली. आता आर्यन एनसीबी कोठडीत आहेत. तो जामीनावर सुटतो की एनसीबी कोठडीतील त्याचा मुक्काम आणखी वाढतो, हे थोड्याच वेळात कळणार आहे. पण तूर्तास आर्यनसाठी हृतिक रोशननं (Hrithik Roshan) लिहिलेली पोस्ट तुफान व्हायरल होतेय.
बॉलिवूडचे अनेक स्टार्सनी शाहरूख व आर्यनला पाठींबा दिलाय. आता हृतिक रोशनने आर्यनसाठी भलीमोठी पोस्ट लिहिली. त्याच्या पोस्टची सुरूवात होतेय, तीच मुळी ‘ माय डिअर आर्यन...,’ या शब्दांनी. लिहिलेल्या या पोस्टमध्ये हृतिकने आर्यनवर अक्षरश: प्रेमाचा वर्षाव केला आहे. (Hrithik Roshan touching note for Aryan Khan)
हृतिक म्हणाला...
माय डिअर आर्यन,
आयुष्य एक अतिशय विचित्र प्रवास आहे. आयुष्य उत्तम आहे, कारण ते अनिश्चित आहे. पण देव दयाळू आहे. तो फक्त खंबीर लोकांच्याचीच परीक्षा घेतो. तुला माहित आहे की, तू खंबीर आहेस म्हणूनच हा प्रसंग तुझ्यावर ओढवला आहे. या अफरातफरीत तू स्वत:ला सांभाळू शकतोस, हे तुला ठाऊक आहेच. अशा परिस्थिती तुम्हाला राग,गोंधळ, असहाय्य्यता वाटणं अत्यंत साहजिक आहे आणि एखाद्या हिरोला यातून बाहेर पाडण्यासाठी यासर्व गोष्टींची आवश्यकता असतेच. मात्र सावध राहा कारण याच गोष्टी तुम्हाला जाळून राखसुद्धा करू शकतात. त्यामुळे स्वतःमध्ये करुणा, दयाळूपणा आणि प्रेम या गोष्टी ठेवून स्वतः ला जळण्याची परवानगी द्या. यश, अपयश, सुख,समाधान, चुका या सर्व गोष्टी समान आहेत. फक्त आपण ठरवायचं असतं की यातील कोणत्या गोष्टी आपण आपल्या जवळ ठेवायच्या आणि कोणत्या गोष्टी अनुभवातून दूर फेकून द्यायच्या. मात्र या सर्व गोष्टी शेवटी तुमच्याच आहेत. त्या सर्वांचे मालक व्हा. मी तुला लहानपनापासून ओळखतो. पण आता तू मोठा झाल्यावरही मला तुला जाणून घ्यायचं आहे. सगळं काही आत्मसात कर. जे काही अनुभव मिळतील, त्या तुला मिळालेल्या भेटवस्तू आहेत. माझ्यावर विश्वास ठेव. एकदिवस, मागे वळून पाहशील तेव्हा तुला माझे हे शब्द आठवतील. सर्व भावनारुपी राक्षसाच्या डोळ्यात डोळे घालून पाहतांना शांत राहणार असतील तर उद्याचा दिवस तुझा असेल. येणारा दिवस सूर्याच्या तेजाने चमकेल. पण त्याआधी तुला अंधारातून जावं लागेल. शांत राहा, धैर्य बाळग आणि स्वत:ला सांभाळ. प्रकाशावर विश्वास ठेव, कारण तो तुझ्या आत आहे. मी तुझ्यासोबत आहे. लव्ह यू मॅन...