करण जोहरच्या 'मुंबईकर' चित्रपटाचा फर्स्टलूक प्रदर्शित; सोशल मीडियात जोरदार चर्चा

By मोरेश्वर येरम | Published: January 1, 2021 07:56 PM2021-01-01T19:56:13+5:302021-01-01T19:58:21+5:30

'मुंबईकर' हा चित्रपट एक अॅक्शन थ्रीलरपट असणार असून मुंबईच्या विविध आठवणींना उजाळा या चित्रपटातून होणार आहे.

mumbaikar first look karan johar releases first look of vijay sethupathi and vikrant massey film | करण जोहरच्या 'मुंबईकर' चित्रपटाचा फर्स्टलूक प्रदर्शित; सोशल मीडियात जोरदार चर्चा

करण जोहरच्या 'मुंबईकर' चित्रपटाचा फर्स्टलूक प्रदर्शित; सोशल मीडियात जोरदार चर्चा

googlenewsNext


मुंबई
बॉलीवूडचा निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरची निर्मिती असलेल्या 'मुंबईकर' चित्रपटाचा फर्स्टलूक प्रदर्शित करण्यात आला आहे. करण जोहरने त्याच्या ट्विटर हँडलवर चित्रपटाचे पोस्टर ट्विट केले आहे. 

'मुंबईकर' हा चित्रपट एक अॅक्शन थ्रीलरपट असणार असून मुंबईच्या विविध आठवणींना उजाळा या चित्रपटातून होणार आहे. करण जोहरने चित्रपटाचे पोस्टर ट्विट केल्यानंतर ट्विटरवर #Mumbaikar हॅशटॅग देखील ट्रेडिंगमध्ये असल्याचं पाहायला मिळालं.

'मुंबईकर' हा चित्रपट उत्कृष्ट सिनेमॅटीक अनुभव देईल, असा विश्वास करणने व्यक्त केला आहे. 'स्लमडॉग मिलेनिअर'नंतर पुन्हा एकदा मुंबईला अनोख्या अंदाजात पाहण्याची संधी या चित्रपटातून मिळणार आहे. 

'मुंबईकर' चित्रपटाचं दिग्दर्शन संतोष सिवन यांनी केलं असून यात विक्रांत मेस्सी, विजय सेथूपति, संजय मिश्रा, रणवीर शौरी आणि सचिन खेडेकर हे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. करण जोहर या चित्रपटाची निर्मिती करत आहे. 

"प्रत्येक शहराचं एक वेगळं सौंदर्य असतं. हे मुंबईच्या बाबतीतही लागू होतं. मुंबईत एक चुंबकीय आकर्षण आहे. त्यामुळेच संपूर्ण भारतातून लोक मुंबईत येत असतात. या विविध क्षेत्राच्या आणि विविध धर्माच्या लोकांचा समावेश असतो. या शहरात स्वप्न पूर्ण होतात. काँक्रीटच्या जंगलात अनेकांच्या हृदयाची धडधड सुरू असते. मुंबई एक मेट्रो शहर असू शकतं पण मुंबईकरांसाठी हे शहर म्हणजे एक भावना आहे", असं दिग्दर्शक संतोष सिवन म्हणाले. 
 

Web Title: mumbaikar first look karan johar releases first look of vijay sethupathi and vikrant massey film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.