Join us

मुनव्वर फारुकीचे गर्लफ्रेंड नाझिलाशी ब्रेकअप? 'या' कारणामुळे होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 1:38 PM

'लॉक अप' या रिऍलिटी शोमधून बाहेर आल्यानंतर मुनव्वरने नाझिलाला डेट करत असल्याचा खुलासा केला होता.

'बिग बॉस हिंदी'च्या नव्या पर्वाला दणक्यात सुरुवात झाली आहे. 'बिग बॉस 17'मध्ये या रिएलिटी शोचं स्वरुप पूर्णपणे बदलण्यात आलं आहे. या शोमध्ये छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय कलाकारांनी एन्ट्री घेतली आहे.  स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीदेखील आहे. व्यावसायिक आयुष्यासोबतच मुनव्वर आपल्या खाजगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत आहे.

 'लॉक अप' या रिऍलिटी शोमधून बाहेर आल्यानंतर मुनव्वरने नाझिलाला डेट करत असल्याचा खुलासा केला होता. लॉकअपच्या सक्सेस पार्टीतसुद्धा तो नाझीलासोबत सहभागी झाला होता. त्यानंतर बऱ्याचवेळा ते मुंबईत एकत्र हँग आउट करताना दिसून आले होते. 'हलकी सी बरसात' या म्युझिक व्हिडीओमध्येही त्यांनी एकत्र काम केलं होतं. परंतु आता दोघांचे ब्रेकअप झाल्याचं वृत्त समोर येत आहे.

काही दिवसांपुर्वी नाझिलाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. त्यानंतर आता तिने इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट केले आहे. यावरुनच नाझिलाचे आणि मुनव्वरचे ब्रेकअप झाल्याचे बोलले जात आहे. शिवाय, आयशा खाननेही मुनव्वरवर डबल डेटिंग केल्याचा आरोप केला होता. तर दुसरीकडे बिग बॉसच्या घरात मन्रारा आणि मुनव्वर यांच्यात चांगले ट्यूनिंग पाहायला मिळत आहे.

मुनव्वर फारुकी हा लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन आहे. आपल्या विनोदाने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करणाऱ्या मुनव्वरला वैयक्तिक आयुष्यात मात्र अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. मुनव्वर फारुकीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. कंगना रनौतचा 'लॉकअप' हा कार्यक्रम त्याने जिंकला असून आता 'बिग बॉस 17'च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्यासाठी तो सज्ज आहे.

टॅग्स :सेलिब्रिटीटिव्ही कलाकारबिग बॉस