Join us

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीनं भल्याभल्यांचा मोडला रेकॉर्ड, आमिताभ बच्चन अन् दीपिकाही पडली मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 13:28 IST

शर्वरीनं MDbच्या Popular Indian Celebrities च्या यादीत अव्वल स्थान मिळवलं आहे. 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवगंत नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची नात शर्वरी वाघ (Sharvari Wagh) ही सध्या चर्चेत आहे. नुकतंच तिचा 'मुंज्या' हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली.  'मुंज्या' शिवाय शर्वरी ही  'महाराज' या चित्रपटातही झळकली. दोन्ही सिनेमांमधील शर्वीच्या भुमिकेचं विशेष कौतुक झालं आहे.  अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. शर्वरीनं MDbच्या Popular Indian Celebrities च्या यादीत अव्वल स्थान मिळवलं आहे. 

आता सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शर्वरी हिची चर्चा रंगली आहे.   शर्वरीने एक अभिनेत्री म्हणून तिची अष्टपैलुत्व पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवले आहे. शर्वरीने अभिनेत्री दीपिका पादुकोणला मागे टाकलं आहे. ती या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. तर दिशा पटानी चौथ्या स्थानावर आहे. दिग्दर्शक नाग अश्विन सातव्या स्थानावर आहे. प्रभास 8व्या, अमिताभ बच्चन 15व्या आणि कमल हासन 19व्या क्रमांकावर आहेत. याशिवाय कोटा फॅक्टरी आणि पंचात सारख्या वेब सीरिजमधून लोकप्रिय झालेला अभिनेता जितेंद्र कुमार याला या यादीत 14 वे स्थान मिळाले आहे.

याबद्दल शर्वरीने तिच्या भावना व्यक्त करत म्हणाली, 'हे वर्ष माझ्यासाठी कसं गेलं हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. आता 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणाऱ्या 'मुंज्या'साठी आणि 'महाराज' चित्रपटातील माझ्या विशेष भूमिकेबद्दल मला मिळालेल्या सर्व प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे. IMDbच्या Popular Indian Celebrities यादीत प्रथम स्थान मिळवणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मी आणखी मेहनत करतेय, जेणेकरून मी खूप चांगल्या चित्रपटांचा भाग होऊ शकेन. माझं डोकं आणि मन दोन्ही या एकाच ध्येयाच्या दिशेने धावत आहे. इंडस्ट्रीशी कोणताही संबंध नसलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीसाठी, प्रत्येक व्हिक्टरी ही मला चांगले प्रोजेक्ट्स आणि चांगल्या भूमिका शोधण्यासाठी सक्षम करते'.

मुंबईतील एका मराठी कुटुंबात 14 जून 1997 रोजी जन्मलेली शर्वरी वाघ ही राजकीय कुटुंबातील आहे.  शर्वरी ही महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध राजकारण्याची नात असून तिचे आजोबा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. तिच्या आजोबांचा राजकारणात चांगलाच दबदबा आहे. शर्वरी ही माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात असून शर्वरीची आई नम्रता वाघ ही मनोहर जोशी यांची मुलगी आहे. शर्वरीच्या वडिलांचे नाव शैलेश वाघ असून ते प्रसिद्ध उद्योगपती आहेत.  तर तिची आई नम्रता आर्किटेक्ट आहे.

टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमामनोहर जोशी