Join us

संगीतकार प्रीतमला ऑफिस बॉयनेच गंडा घातला, ४० लाख रुपये घेऊन फरार झाला; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 09:33 IST

लोकप्रिय संगीतकार प्रीतमचे ४० लाख रुपये घेऊन ऑफिस बॉय फरार, नेमकं काय घडलं? (pritam)

सैफ अली खानच्या (saif ali khan) घरी चोराने केलेल्या हल्ल्याचं प्रकरण ताजं असतानाच बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार प्रीतम चक्रवर्तीच्या ऑफिसमध्ये ४० लाखांची चोरी झाल्याचं प्रकरण समोर आलंय. प्रीतमचा (pritam) मॅनेजर विनित चेड्डाने मालाड पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केलीय. पोलिसांनी या प्रकरणी प्रीतमचा ऑफिस बॉय आशिष सयालची आरोपी म्हणून ओळख पटवली असून तो सध्या फरार आहे. आशिषचा पोलीस तपास करत आहेत.

प्रीतमच्या ऑफिसमध्ये चोरी, नेमकं प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, ४ फेब्रुवारीला दुपारी २ च्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी प्रॉडक्शन हाउसचा एक कर्मचारी प्रीतमच्या गोरेगाव येथील म्यूझिक स्टूडियोमध्ये आला. त्याने प्रीतमच्या मॅनेजरला एका बॅगमध्ये ४० लाख रुपयांची कॅश दिली. तिथे आरोपी आशिष सयालसोबत अहमद खान आणि कमल दीशा उपस्थित होते. मॅनेजरने ते पैसे एका ट्रॉलीत ठेवले. पुढे काही कागदपत्रांवर सही करण्यासाठी तो  प्रीतमच्या घरी गेला. ज्या बिल्डिंगमध्ये ऑफिस तिथेच प्रीतमचं घर आहे.

जेव्हा प्रीतमचा मॅनेजर परत ऑफिसमध्ये आला तेव्हा पैशांची बॅग गायब होती. मॅनेजरने आशिषला याप्रकरणी संपर्क केला परंतु कोणतंही उत्तर मिळालं नाही. पुढे आशिषचा फोनही बंद आला. त्यामुळे मॅनेजरने त्याच्यावर संशय व्यक्त केला. प्रीतमच्या सुचनेनुसार मॅनेजरने याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधलाय.  त्यामुळे आरोपी आशिष सयालला अटक करण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत.

 

टॅग्स :प्रीतमबॉलिवूडसैफ अली खान पोलिस