मुंबई: संगीतकार, गायक सलील कुलकर्णी यांना कोरोनाची लागण झाली आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली. संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. (Musician singer Saleel Kulkarni tested positive for coronavirus)'सर्वतोपरी काळजी घेऊनही आज माझी कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. घरीच आयसोलेट करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू केले आहेत. गेल्या एका आठवड्यात जे जे भटले त्यांना कल्पना असावी या दृष्टीनं ही पोस्ट,' असं सलील कुलकर्णी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
संगीतकार, गायक सलील कुलकर्णी यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 21:11 IST