Join us

'मुस्लिमांनी मदरशा, हिजाब आणि सानिया मिर्झाचा स्कर्ट...', नसिरुद्दीन शाह यांनी मांडलं परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 3:22 PM

अभिनेते नसीरुद्दीन शाह हे नेहमीच चर्चेत राहणारे एक नाव आहे.

अभिनेते नसीरुद्दीन शाह हे नेहमीच चर्चेत राहणारे एक नाव आहे. अनेक हिट चित्रपटांमध्ये नसीरुद्दीन शाह यांनी महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. नसीरुद्दीन शाह कायम त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. चित्रपटसृष्टी असो वा सामाजिक मुद्दे या मुद्द्यांवर ते आपले मत उघडपणे मांडतात. आता पुन्हा एकदा त्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. मुस्लिम समुदाय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर त्यांनी भाष्य केलं. 

नुकतेच नसीरुद्दीन शाह यांनी पत्रकार करण थापर यांना मुलाखत दिली. नसीरुद्दीन शाह यांनी मुस्लिम समाजाच्या बंधुत्वाशी संबंधित मुद्द्यांवर अधिक भर दिला. यावेळी त्यांनी मुस्लिमांना हिजाब आणि सानिया मिर्झाच्या स्कर्टची चिंता करणे थांबवून शिक्षणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असा सल्ला दिला.

पुढे ते म्हणाले,  "मदरशांच्या ऐवजी शिक्षणांवर मुस्लिमांनी लक्ष द्यायला हवं. फक्त धार्मिक शिक्षण न घेता आणि आधुनिक विचारांची चिंता करायला हवी. मुस्लिमांनी जाग होण्याची हीच  वेळ आहे'. यासोबतच कॅबिनेटमध्ये एकही मुस्लिम नाही. ही गोष्ट आश्चर्यचिकत करणारी नसल्याचं त्यांनी म्हटलं. 

नसीरुद्दीन म्हणाले, 'मोदींना विरोध करणे खूप सोपे आहे.  हे सत्य आहे की मोदी सत्तेवर येण्यापूर्वीही या देशात बरेच काही चुकीचं होते. आपल्या देशात धर्मांमध्ये नेहमीच वैमनस्याची भावना राहिली आहे.  मला पंतप्रधान मोदींना इस्लामिक टोपी घातलेलं पाहायचं आहे. त्यामुळे देशातील मुस्लिम लोकांना एक संदेश मिळेल की ते कधीच त्यांच्या विरोधात नव्हते. ते त्यांचे शत्रू नाहीयेत. त्यामुळे खूप मदत होईल'. सध्या नसीरुद्दीन यांची ही मुलाखत प्रचंड चर्चेत आहे.

टॅग्स :नसिरुद्दीन शाहनरेंद्र मोदीबॉलिवूडसेलिब्रिटीमुस्लीम