Join us

या गोष्टीबाबत करण व्होरा नेहमीच असतो सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 4:42 PM

‘स्टार प्लस’वरील ‘कृष्णा चली लंडन’ मालिकेत हट्टी डॉ. वीरची भूमिका साकारणारा अभिनेता करण व्होराने आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांवर चांगलीच छाप टाकली आहे.

ठळक मुद्देडॉ. वीरची व्यक्तिरेखा ही काहीशी नकारात्मक

‘स्टार प्लस’वरील ‘कृष्णा चली लंडन’ मालिकेत हट्टी डॉ. वीरची भूमिका साकारणारा अभिनेता करण व्होराने आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांवर चांगलीच छाप टाकली आहे. या मेहनती अभिनेत्याच्या मते तुम्हाला टीव्हीचा पडदा आपल्या अस्तित्त्वाने भारून टाकायचा असेल, तर तुम्हाला तुमच्या शारीरिक स्वास्थाकडे लक्ष द्यावेच लागेल.

याबाबत करणने सांगितले, “शारिरीक स्वास्थ हा माझ्या दृष्टीने एक महत्त्वाचा भाग आहे. शारिरीक स्वास्थाच्या बाबतीत  मी अतिशय शिस्तबध्द असून मी तो प्रामाणिकपणे पाळतो. चित्रीकरण कितीही वेळ सुरू असलं, तरी मी दररोज जिममध्ये जातोच. डॉ. वीरची व्यक्तिरेखा ही तशी भारदस्त असून ते नेहमी टापटिप कपडे परिधान करतात. त्यामुळे मला माझं शरीर योग्य त्या आकारात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही कॅमेऱ्यात जितके आकर्षक दिसाल, तितकं प्रेक्षकांना तुम्हाला पाहावंसं वाटेल, असं माझं मत आहे. तुम्ही जे कपडे घालता, ते तुमच्या शरीरावर चांगले दिसले पाहिजेत. शारीरिक स्वास्थाबद्दल मी जितका काटेकोर आहे, त्यानेच माझ्यातील अभिनेत्याला घडवलं आहे, असं मला वाटतं.” प्रेक्षकांना आपली डॉ. वीरची भूमिका पसंत पडत असावी, अशी अपेक्षा डॉ. वीरच्या भूमिकेमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या करणने व्यक्त केली आहे.

डॉ. वीरची व्यक्तिरेखा ही काहीशी नकारात्मक असून त्याला त्याच्या भूतकाळात काही कटू अनुभव घ्यावे लागल्याने आज त्याचा स्वभाव अस बनला आहे. आपली ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी करणने चक्क अमिताभ बच्चन यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे. याची माहिती मात्र फारच थोड्या लोकांना होती. 

टॅग्स :कृष्णा चली लंडन