Join us

'मेरा हमसफर उससे भी अच्छा है', मानसी नाईकने नवऱ्यासोबतचा रोमँटिक फोटो केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2021 7:00 AM

मानसी नाईक हिने प्रदीप खरेरा सोबतचा रोमँटिक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

बघतोय रिक्षावाला म्हणत आपल्या तालावर थिरकायला लावणारी अभिनेत्री मानसी नाईक सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. बऱ्याचदा ती सोशल मीडिया इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिने नवरा प्रदीप खरेरा सोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती रोमँटिक अंदाजात दिसते आहे. या फोटोला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.

मानसी नाईक हिने प्रदीप खरेरा सोबतचा रोमँटिक फोटो शेअर करत लिहिले की, मेरा सफर अच्छा है...लेकिन मेरा हमसफर उससे भी अच्छा है... या फोटोत मानसी नाईक प्रदीप खरेराच्या जवळ उभी असून लाजताना दिसते आहे. तिच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.

या व्यतिरिक्त मानसी नाईकने प्रदीप खरेरासोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. ते दोघे आपके आ जाने से या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत मानसीने लिहिले की, हसणे, कोणते कठीण काम आहे. फक्त तुझा विचार करावा लागतो. या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. 

मानसी व प्रदीप बऱ्याच कालावधीपासून एकमेकांना डेट करत होते. शेवटी यावर्षी १९ जानेवारीला मानसी व प्रदीप लग्नबंधनात अडकले. मानसीचा नवरा प्रदीप खरेरा हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. त्यासोबतच तो अभिनेता आणि मॉडेल आहे.

तर मानसी ही उत्तम डान्सर असून ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिएलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून डान्सने रसिकांना भुरळ पाडली आहे. तसेच रुपेरी पडद्यावरही मानसीने आपल्या अभिनयाद्वारे रसिकांची मनं जिंकली आहेत.

टॅग्स :मानसी नाईक