अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम (Madhura Velankar-Satam) मराठी सिनेइंडस्ट्रीतील गुणी अभिनेत्री आहे. तिने मराठी आणि बॉलिवूड चित्रपटामध्ये काम केले आहे. मधुराने अभिजीत साटम(Abhijeet Satam)सोबत लग्न केले. सीआयडी फेम अभिनेते शिवाजी साटम (Shivaji Satam) तिचे सासरे आहेत. तर अभिनेते प्रदीप वेलणकर (Pradip Velankar) तिचे वडील आहेत. दरम्यान आता नुकतेच तिने लोकमत फिल्मीच्या 'लव्ह गेम लोचा' या शोमध्ये पती अभिजीतसोबत हजेरी लावली होती. यावेळी तिने सासऱ्यांचं कौतुक केलं. ती म्हणाली की, त्यांनी मला नेहमीच मुलीसारखी वागवले.
माझे सासऱ्यांचं अनेक वर्ष घरात खूप छान लक्ष असते. मी त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकले आहे. पुरुष असूनही सीआयडीचं शूटिंग चालू असूनदेखील घरात काही संपलं आहे का, मुलं काय खातापीतात, बिलं भरणं अशा सगळ्या बारीकसारीक गोष्टींकडे त्यांचं लक्ष असते. त्यामुळे नकळत मी त्यांच्याकडून काही काही गोष्टी शिकले. ते वडील असल्यामुळे माझ्यावर अशी जबाबदारी आली नाही.
ती पुढे म्हणाली की, मी अभिनेत्री आहे, हे माहित असल्यामुळे मी सकाळी ७ला उठून त्यांना चहा देईन, अशी अपेक्षा कधीच त्यांनी केली नाही. माझे शूटिंग असेल आणि मी रात्री उशीरा आले तर १० वाजता उठते. तेव्हा ते स्वतःचा चहा स्वतः बनवून पितात. तसेच बाईला काय काम करायचं ते सांगतील. मला त्यांनी कधीच सूनेसारख्या माझ्याकडून अपेक्षा ठेवल्या नाहीत. त्यांनी नेहमीच मला मुलीसारखं वागणूक दिली.
मधुरा वेलणकर साटमचे ‘सरीवर सरी’मधील गोजिरीच्या भूमिकेसाठी तिचं कौतुक झालं. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जजंतरम ममंतरम’ या चित्रपटात तिने राजकुमारी अमोरीची भूमिका साकारली होती. मधुराने डान्सर आणि निवेदिका म्हणून जवळपास ७५हून अधिक स्टेज शोज केले आहेत.