Join us

'माझे पणजोबा स्वातंत्र्य सैनिक होते, त्यामुळेच मला…'; कंगना राणौत जुन्या व्हिडीओमुळे झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 5:19 PM

कंगना राणौत गेल्या काही दिवसांपासून १९४७ मध्ये मिळालेल्या स्वातंत्र्यावर केलेल्या वक्तव्यामुळे ट्रोल होत आहे.

बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत बऱ्याचदा तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येत असते. काही दिवसांपूर्वी कंगनाने १९४७ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य ही भीक म्हणून मिळाली आहे, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो आहे. यावेळी कंगनाला काँग्रेसचे नेते सलमान निझामी यांनी ट्रोल केले आहे.

सलमान निझामी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर कंगना राणौतचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत कंगना बोलताना दिसते आहे की माझे पणजोबा स्वातंत्र्यसैनिक होते. त्यामुळे मी जेव्हा कोणती सरकारी परिक्षा द्यायची तेव्हा मला कोटा मिळायचा. कंगनाचा हा व्हिडीओ शेअर करत सलमान निझामी म्हणाले, पणजोबा स्वातंत्र्य सैनिक होते, त्यामुळे तू जसं बोलते त्या प्रमाणे, ते ही भिकारी होते ना? आणि कंगनाला भीकमध्ये सरकारी कोटा मिळाला? नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे ते स्पष्ट करा!

या कारणामुळे कंगना होतेय ट्रोल

दरम्यान, एका मुलाखतीत कंगना म्हणाली होती की, देशाला १९४८ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे स्वांतत्र्य नसून ती भीक होती. आपल्याला खरे स्वातंत्र्य हे २०१४ मध्ये मिळाले. देशात जेव्हा काँग्रेसचे सरकार होते, त्यावेळी मला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. मी आता राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर चर्चा करते. सैन्यदलाबद्दल बोलते किंवा आपल्या संस्कृतीच्या प्रचाराबद्दल काम करते. पण त्यावेळी लोक मला मी भाजपचा अजेंडा चालवत आहे, असे सांगतात. तसेच या मुद्द्यावरुन मला भाजपसोबत जोडले जाते. पण हे सर्व मुद्दे भाजपचे कसे काय होऊ शकतात? हे तर देशाचे मुद्दे आहेत. या कारणामुळे कंगनाला ट्रोल केले जात आहे.

टॅग्स :कंगना राणौत