Join us

नवरा राज कौशलच्या निधनानंतर कोलमडून गेलीय मंदिरा बेदी, निकनेमसोबत लिहिला हा मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 14:15 IST

मंदिरा बेदीचा नवरा राज कौशलचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे.

मंदिरा बेदीचा नवरा राज कौशलचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे. तिने स्वतःच आपल्या नवऱ्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले होते. नवऱ्याच्या निधनानंतर मंदिरा बेदी पूर्णपणे कोलमडून गेली आहे. दरम्यान आता मंदिराने सोशल मीडियावर नवरा राज कौशलच्या आठवणीत भावूक पोस्ट केली आहे. या फोटोत त्या दोघांचे एकमेकांवर किती प्रेम होते, हे दिसून येते. तिची ही पोस्ट पाहून अनेकजण भावूक झाले आहेत. 

नुकतेच मंदिरा बेदीने सोशल मीडिया ट्विटरवर नवऱ्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, RIP माझा राजी. यासोबतच तिने हृदय तुटणारी इमोजी टाकली आहे.

तसेच मंदिराने राजसोबतचे काही फोटो इंस्टाग्रामवरदेखील शेअर केले होते. या फोटोत मंदिरा आणि राज दोघांच्या हातात ड्रिंकचे ग्लास पहायला मिळत आहे आणि दोघेही खूप खूश दिसत आहे. दोघांच्या गळ्यात एक मेडलही पहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करत मंदिरा बेदीने काहीच कॅप्शन लिहिलेले नाही. तिने कॅप्शन लिहिण्याऐवजी हृदय तुटणारे इमोजी शेअर केली आहे.

मंदिराच्या या पोस्टवर तिचे बरेच मित्रमंडळी कमेंट करत तिचे सांत्वन करत आहेत. मंदिराचा नवरा सिनेइंडस्ट्रीतला प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता होता. राज कौशलचे ३० जूनला हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले.

टॅग्स :मंदिरा बेदी