Join us

Myra Wailkul Video : मराठी नाही तर परीची हिंदीत झेप, 'या' मालिकेत छोट्या मायराची मुख्य भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 14:54 IST

या मालिकेतही मायराचा खोडकर अंदाज दिसणार आहे शिवाय तिच्या लुकमध्ये बराच बदल झाला आहे

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली बालकलाकार म्हणजे मायरा वायकुळ (Myra Vaikul). तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिका बंद झाली असली तरी प्रेक्षकांच्या मनातील परीचं घर कायम आहे. आता मायराच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. मायरा लवकरच छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे पण मराठी नाही तर चक्क हिंदी मालिकेतून.

होय, मायराच्या इन्स्टाग्राम पेजवरुन तिच्या नवीन मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आलाय. कलर्स वाहिनीवर 'नीरजा : एक नयी पहचान' या मालिकेत ती दिसणार आहे. इतकंच नाही तर ही तिची मध्यवर्ती भूमिका असणार आहे. मायरा नीरजा हेच मुख्य पात्र साकारणार आहे. माझी तुझी रेशिमगाठ मालिकेनंतर मायराला मिळालेला हा मोठा ब्रेक आहे. नीरजा मालिकेत अभिनेत्री स्नेहा वाघ (Sneha Wagh) ही तिच्या आईची भूमिका साकारताना दिसणार आहे.

प्रोमो पाहिला तर लक्षात येतंय की या मालिकेतही मायराचा खोडकर अंदाज दिसणार आहे. तसंच तिचा लुकही खूप बदलला आहे. या मालिकेत तिचे केस मोठे आहेत तसंच आपली इवलीशी मायरा आता मोठी दिसायला लागली आहे.

याशिवाय मायरा झी मराठीवरील लोकप्रिय 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातही दिसणार आहे. झी मराठी वाहिनीच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर या शोचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या शोमध्ये बच्चे कंपनीची कॉमेडी खास असणार आहे. ‘चला हवा येऊ द्या’ लहान तोंडी मोठा घास. १५ मे पासून सुरु होणार आहे.  

टॅग्स :मायरा वैकुलहिंदीमराठी अभिनेताटिव्ही कलाकारस्रेहा वाघ