नाद खुळा... IAS पदाचा दिला राजीनामा; सनी लिओनीसोबत रॅप, नशिब आजमवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 11:42 AM2023-10-25T11:42:23+5:302023-10-25T11:45:32+5:30
अभिषेक यांनी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देताना गुडन्यूज दिली
उत्तर प्रदेशमधील निलंबित करण्यात आलेले आयएएस अधिकारी अभिषेक सिंह पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आपली हौस पूर्ण करण्यासाठी ते आता बॉलिवूडचे दरवाजे ठोठावत आहेत. विशेष म्हणजे आयएएस पदाची नोकरी सोडून त्यांनी एक रॅप साँग बनवलं आहे. स्वत: अभिषेक यांनी X अकाऊंटवरुन दिली. विशेष म्हणजे त्यांनी पहिलं रॅप साँग थेट सनी लिओनीसोबत बनवलं आहे. लवकरच हे रॅप साँग प्रदर्शित होणार असल्याचंही त्यांनी सांगितले.
अभिषेक यांनी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देताना गुडन्यूज दिली. आपल्या पहिल्या रॅप साँगचं शुटींग पूर्ण झालं असून लवकरच हे चाहत्यांना पहायला मिळेल, असे त्यांनी म्हटले. तसेच, लवकरच मी सनी लिओनीसोबत जॉनपूरला येईल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, हे रॅप साँग स्वत: अभिषेक यांनी गायलं असून सनी लिओनीच्या नृत्याने त्यात ग्लॅमर आलं आहे. माजी आयएएस अधिकारी अभिषेक यांच्या पोस्टवर चाहते कमेंट करुन वेगवेगळ्या डिमांड ठेवत आहेत. एका युजर्सने बीएचयु कॅम्पसमध्ये येण्याचं आवाहन केलं. त्यावर, रिप्लाय देत अभिषेक यांनी, तुम्ही बोलवा तर आधी, असे उत्तर दिले आहे.
To all my brothers, sisters and elders of Jaunpur. What an auspicious day! We just wrapped up the video shoot of my debut rap song, which I have sung myself.. “Meri party mein koi third party nahi” 😊
— Abhishek Singh (@Abhishek_asitis) October 24, 2023
Sunny’s presence has added glamour and life to the video. I’m sure you will… pic.twitter.com/kELDh9x1UW
अभिषेक हे उत्तर प्रदेश कॅडररचे आयएएस दर्जाचे अधिकारी होते. नुकतेच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यापूर्वी २०२३ मध्ये गुजरात निवडणुकांवेळी सरकारी गाडीसमोर फोटो काढून तो सोशल मीडियावर टाकला होता. त्यामुळे, त्यांचे निलंबन करण्यात आले होते. त्यावेळी, ते गुजरात निवडणूकीसाठी निरीक्षक म्हणून कार्यरत होते. या घटनेनंतर त्यांनी आपल्या आयएएस पदाचा राजीनामा दिला असून आता बॉलिवूडमध्ये नशिब आजवणार आहेत. अभिषेक यांचे वडिलही आयपीएस अधिकारी होते. तर, त्यांची पत्नी दुर्गाशक्ती या देखील उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध आयएएस अधिकारी आहेत.