Join us

Nach Baliye 9: मधुरिमा तुलीच्या या वर्तवणुकीमुळे नाराज झाले जज, मग घडले असे काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 17:12 IST

नच बलिये 9 हा रिअॅलिटी शो प्रसारित झाल्यापासून डान्ससाठी कमी आणि भांडणांना घेऊन जास्त चर्चेत आहे.

नच बलिये 9 हा रिअॅलिटी शो प्रसारित झाल्यापासून डान्ससाठी कमी आणि भांडणांना घेऊन जास्त चर्चेत आहे. शोमध्ये रोज एक नवा ड्रामा बघायला मिळतो. मधुरिमा तुली आणि विशाल आदित्य सिंग आपल्या सवयींमुळे चर्चेत आली आहे.  डान्स परफॉर्मेन्स दरम्यान मधुरिमा स्टेप्स विसरुन गेली. 

हिंदी रुशच्या रिपोर्टनुसार, मधुरिमा तुली परफॉर्मेन्स करताना डान्स स्टेप्स विसरुन गेली आणि त्यानंतर ती चक्क बॅकस्टेज निघून गेली. तिच्या या वागण्यामुळ परिक्षक अहमद खान प्रचंड नाराज झाला. दोघांना भलेही परफॉर्म करण्याची एक संधी दिली मात्र मार्क्स देण्यास नकार दिला.    

काही दिवसांपूर्वी रिहर्सल दरम्यान दोघांमध्ये खूप वाद-विवाद झाले होते. रागात येऊन विशालने मधुरिमाला अपशब्द वापरले होते तसेच तिला खुर्चीवरुन धक्कादेखील दिला. काहीवेळानंतर विशाल मधुरिमाची माफीदेखील मागितली होती. नच बलिये 9 मध्ये दोघांची वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे. 

मधुरिमा आणि विशाल चंद्राकांतामध्ये एकत्र दिसले होते. या मालिकेदरम्यान त्यांच्या रिलेशनशीपला सुरुवात झाली. मात्र दोघांचे नातं फारकाळ टिकले नाही आणि दोघांनी आपलं रस्ते बदलेले. आता दोघे नच बलियेमध्ये एकत्र दिसतायेत. दोघांच्या डान्सला खूप मस्ती मिळते दोघांमधली केमिस्ट्रीही शानदार आहे.

टॅग्स :नच बलिये