‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या सिनेमावरून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आणि याचं कारण आहे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाअर्थात इफ्फीचे (IFFI) ज्युरी प्रमुख नादव लापिड (Nadav Lapid) यांनी या सिनेमाबद्दल केलेलं एक विधान. होय, इस्रायली चित्रपट निर्माते नादव लापिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ला ‘ व्हल्गर प्रोपगंडा फिल्म’ संबोधलं आणि यावरून रान माजलं.
नादव लापिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ला व्हल्गर, प्रोपगंडा फिल्म म्हणणं अनेकांना आवडलं नाही. ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, अभिनेते अनुपम खेर यांनी नादव यांच्या या वक्तव्यावर जळजळीत प्रतिक्रिया देत त्यांची निंदा केली. यासगळ्यात अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) ही मात्र नादव लापिड यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरली. स्वराने ज्युरी हेड नादव लापिड यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’वर दिलेल्या वक्तव्याशी संबंधित बातमीची लिंक शेअर करत, एक ट्विट केलं. सध्या तिचं हे ट्विट व्हायरल होतंय.
काय आहे स्वराचं ट्विट
‘द काश्मीर फाइल्स’ मुद्यावर स्वराने इस्रायली निर्माते नादव लापिड यांना पाठींबा दिला. आता हे जगासमोर स्पष्ट झालं आहे, असं ट्विट तिने केलं आहे. स्वराने या मुद्यावर दिलेली ही प्रतिक्रिया फार काही आश्चर्यकारक नाही. कारण याआधीही अनेकदा ‘द काश्मीर फाइल्स’ प्रोपगंडा फिल्म असल्याचं ती म्हणाली आहे. ‘द काश्मीर फाइल्स’चा विरोध करणाºयांमध्ये स्वरा भास्करचं नावही सामील आहे.
काय म्हणाले इफ्फी ज्युरी हेड?गोव्यातील पणजी येथे आयोजित इफ्फी महोत्सवात इफ्फी ज्युरी हेड व इस्रायली चित्रपट निर्माते नादव लापिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावर टीका केली. ‘आम्ही सर्व नाराज आहोत. हा चित्रपट आम्हाला ‘प्रोपगंडा, व्हल्गर ’ वाटला. एवढ्या मोठ्या प्रतिष्ठेच्या चित्रपट महोत्सवासाठी द काश्मीर फाइल्स योग्य नाही. मी व्यासपीठावर माझ्या भावना मोकळेपणाने शेअर करू शकतो. कारण ही एक महत्त्वाची चर्चा आहे आणि ती मोकळेपणानं व्हायला हवी. कला आणि जीवनासाठी ते आवश्यक आहे,’ असं ते म्हणाले.