Join us  

बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये नागराज मंजुळेचा ‘सैराट’

By admin | Published: February 20, 2016 11:32 PM

मराठी फिल्मसृष्टीत ‘फॅन्ड्री’ चित्रपटाला मिऴालेल्या यशानंतर आता दिग्दर्शक नागराज मंजुळेचा ‘सैराट’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. मात्र, त्या आधीच ‘सैराट’ हा चित्रपटाचे हॉलीवूड वारी केली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० -  मराठी फिल्मसृष्टीत ‘फॅन्ड्री’ चित्रपटाला मिऴालेल्या यशानंतर आता दिग्दर्शक नागराज मंजुळेचा ‘सैराट’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. मात्र, त्या आधीच ‘सैराट’ हा चित्रपटाचे हॉलीवूड वारी केली आहे. 
बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'सैराट' चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिऴत असल्याचे खुद्द दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनीच आपल्या फेसबुकवरुन यासंदर्भात माहिती पोस्ट केली आहे. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रेक्षकांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहून नागराज मंजुळे खूप खूश झाला आहे. काल बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये जवऴजवळ हजार- बाराशे लोक बसतील एवढ्या प्रचंड मोठ्या चित्रपटगृहात 'सैराट'चा वर्ल्ड प्रिमियर झाला. यावेळी चित्रपटगृह हॉउसफुल होते. 
'सैराट' चित्रपट पाहून अनेक प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. यामुळे आनंदीत होत, एवढ्या मोठ्या प्रतिष्ठेच्या फिल्म फेस्टिवलमधील हा अनुभव अविस्मरणीय असल्याचे नागराज मंजुळेंनी म्हटले आहे. तसेच, त्याने मी खूप उत्सुक आहे 'सैराट'च्या प्रदर्शनासाठी असेही म्हटले आहे. 

 

 

काल बर्लिन आंतरराष्टीय चित्रपट महोत्सवात हजार बाराशे लोक बसतील एवढ्या प्रचंड मोठ्या थिएटर मधे सैराटचा वल्ड प्रीमियर झाला...

Posted by Nagraj Manjule on Friday, February 19, 2016