छोट्या पडद्यावरील 'नागिन' म्हणजेच अभिनेत्री मौनी रायचं नशीब चांगलंच फळले आहे. एकामागून एक विविध हिंदी सिनेमांची लॉटरी तिला लागत आहे. दमदार अभिनयासह आपल्या मादक अदा आणि ग्लॅमरस अंदाजाने तिने रसिकांची मने जिंकली आहेत.तिच्या या अदांवर फिदा होऊन निर्माते टीव्हीच्या 'नागिन'ला आपल्या सिनेमात घेत आहेत. मौनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही रसिकांशी संवाद साधत असते. इथे ती आपले नवनवे फोटो फॅन्ससह शेअरही करते. नुकतंच मौनीने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोतील मौनीचा ग्लॅमरस लूक कुणालाही क्लीन बोल्ड करेल. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत ती वेगवेगळ्या ड्रेसमध्ये आपल्या सौंदर्याची जादू दाखवत आहे. काही दिवसांपूर्वी मौनी डिझायनर मिजवानच्या शोमध्ये झळकली होती. यावेळी मौनीने सिल्व्हर गोल्डनीश सिल्क साडी परिधान केली होती. ही खास आणि आकर्षक साडी मनीष मल्होत्राने डिझाईन केल्याचं तिने कॅप्शनसह नमूद केले होते. मौनीच्या या फोटोवर तिच्या फॅन्सकडून लाईक्सचा वर्षाव झाला होता.आता पुन्हा एकदा मौनी रॉयने फोटोशूट केले आहे.यावेळी तिने हटके लाल रंगचा गाऊन परिधान केल्याचे फोटोत पाहायला मिळत आहे.फोटोत मौनी रॉयच्या या अदा कुणालाही घायाळ करतील अशाच आहेत. (रोज पिझ्झा खा, दूध पी...! मौनी रॉयला चाहत्यांनी दिले एकापेक्षा एक भारी सल्ले!)
सोशल मीडियावर मौनी प्रचंड लोकप्रिय आहे. तिचे इन्स्टाग्रामवर ४.८० लाख फॉलोअर्स आहेत. मौनीला डान्स करणंही पसंत आहे. त्यामुळेच ती आपल्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. लवकरच मौनी खिलाडी अक्षय कुमारसह रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. गोल्ड सिनेमात मौनी अक्कीसह स्क्रीन शेअर करणार आहे. या सिनेमातून मौनी बॉलीवुडमध्ये पदार्पण करणार आहे. यानंतर रणबीर कपूर आणि आलियासह ती एका सिनेमात काम करणार आहे. रणबीर आणि आलियाची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचं नाव ब्रम्हास्त्र असं आहे. मौनीने ‘क्योंकी साँस भी बहू थी’ या मालिकेपासून टीव्ही कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर ‘जरा नच के दिखा’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. ‘देवों के देव महादेव’, ‘बिग बॉस 8’अशा अनेक शोमधून मौनीने स्वत:ची छाप पाडली आहे.