नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांची आता वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. ‘सैराट’ या सिनेमानंतर तर नाहीच नाही. नागराज हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक नामांकित दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. फँड्री, सैराट, हायवे, नाळ यासारखे अनेक सुपरहिट सिनेमे दिग्दर्शित करणारे नागराज अभिनेते म्हणूनही तेवढेच उत्तम आहेत. तूर्तास त्याचीच चर्चा आहे. होय, नागराज यांचा नवा लूक आणि त्यांचा अभिनय पाहून चाहते थक्क झाले आहेत.होय, ‘अनपॉज्ड- नया सफर’ ( Unpaused: Naya Safar) या पाच अनोख्या लघुपटांच्या मालिकेतील नागराज यांचा लुक पाहून क्षणभर तुम्हीही त्यांना ओळखू शकणार नाही. ‘अनपॉज्ड- नया सफर’ या अॅमेझॉन प्राईमवर रिलीज झालेल्या या मालिकेतील ‘वैकुंठ’ नावाची कथा नागराज यांनी दिग्दर्शित केली आहे. यात त्यांनी भूमिकाही केली आहे. प्रेतांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या विकास चव्हाणची भूमिका त्यांनी साकारली आहे.
2020 मध्ये आलेल्या ‘अनपॉज्ड’च्या पहिल्या सीझन अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. आता दुसऱ्या सीझनमध्ये या अमेझॉन ओरिजनल अँथॉलॉजीच्या सिक्वेलमध्ये पाच हिंदी शॉर्ट फिल्म्सचा समावेश करण्यात आला आहे. यात कोरोना महामारीमुळे आपलं आयुष्य कसं बदललं, याची झलक यात पाहायला मिळते आहे.
नागराज यांना अनेक कलाकार प्रेमाने अण्णा म्हणून हाक मारतात. एक कवी, लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक अशा बहुविध भुमिकांमधून प्रवास करणाºया नागराज यांना महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पोलिसात जाण्याची संधी मिळाली. पोलिस भरतीत त्यांची निवड झाली. पण त्यांचं मन तिथे रमलं नाही. तेरा दिवसांची नोकरी करून त्यांनी तिथून पळ काढला. 12 असताना त्यांच्या कवितेला प्रथम क्रमांक मिळाला आणि तिथून आत्मविश्वास वाढला आणि इथूनच पुढे त्यांच्या सिनेसृष्टीतील प्रवासालाही सुरूवात झाली.