व्हॉट्सअॅपचा जमाना आहे राव... स्वत:ची सुखदु:खे इथे फक्त व्हॉट्सअॅपवरच शेअर होतात... वास्तविक आयुष्यात कुठेय वेळ एखाद्याच्या डोळ्यातली ‘आसवं’ पुसायला? प्रत्येक व्यक्ती अस्वस्थ आणि त्रस्त... बाहेरच्याच काय, पण वैयक्तिक आयुष्यातील ‘गुंता’ सोडवायलाही वेळ नाहीये... इथे सर्वांच्या आयुष्यात एकच गोष्ट ‘कॉमन’ आहे, ती म्हणजे ‘एकटेपणा’...! हे संवाद कुठल्या चित्रपटातले नसून चित्र आहे सध्याच्या धकाधकीच्या आयुष्याचं...! सर्वसामान्यांच्या आयुष्यात वाढत चाललेला ‘एकटेपणा’ हा आता चित्रपटाचा विषय होऊ शकतो का? तर हो. येत्या २९ जुलैला प्रदर्शित होणारा ‘लॉस्ट & फाऊंड’ हा चित्रपट याच विषयावर आधारित आहे. स्पृहा जोशी (नैना), सिद्धार्थ चांदेकर (मानस), मोहन आगाशे (श्रीरंगकाका), मंगेश देसाई (मारुती) ही तगडी स्टारकास्ट यात पाहावयास मिळणार आहेत. नैना-मानस यांची रोमँटिक लव्हस्टोरी चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. हे दोघेही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात एकटे असतात. त्यांच्या एकटेपणातून मग त्यांना समाजासाठी ‘अँटी लोनलीनेस प्रोग्रॅम’ची स्थापना करावीशी वाटते. त्यातून ते अनेकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा प्रयत्न करतात, पण शेवटी प्रश्न असतोच. मग नैना-मानसच्या आयुष्यात काय हरवलेय, यासाठी तर चित्रपट पाहावा लागेल ना!
नैना-मानसच्या एकटेपणातून उलगडला ‘लॉस्ट & फाउंड’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2016 2:46 AM