'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातील 'लॉली' म्हणजेच नम्रता संभेराव (Namrata Sambherao) अमेरिकेत आहे. 'कुर्रर्रर्र' या नाटकातील कलाकार प्रयोगाच्या निमित्ताने अमेरिका दौऱ्यावर आहेत. गेला महिनाभर नम्रचा आपल्या मुलापासून दूर सातासमुद्रापार असून काम करत आहे. दरम्यान नम्रताचा मुलगा रुद्रराजचा एक व्हिडिओ नम्रताने शेअर केला आहे.यामध्ये छोटा रुद्रराज गाणं म्हणतोय.
नम्रता मुलाच्या आठवणीत व्याकुळ झाली आहे. 'एकटी एकटी घाबरलीस ना' हे आयुष्यावर बोलू काही मधलं गाणं छोटा रुद्रराज गाताना दिसतोय. त्याचा व्हिडिओ नम्राताने शेअर केला असून भावूक कॅप्शनही लिहिले आहे. ती लिहिते,"एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होत आई म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. हे गाणं जेव्हा जेव्हा ऐकते तेव्हा तेव्हा डोळे पाणवतात लवकरच परत येतेय कधी एकदा तुला घट्ट मिठी मारतेय असं झालंय कारण मी खरंच शूर नाही हे मी इतकं लांब आल्यावर माझ्या लक्षात आलंय कारण क्षणोक्षणी तुझी आठवण आली पण आता मला खात्री आहे माझा सगळा भित्रेपणा छूमंतर होणार कारण लवकरच मी माझ्या शूर बाळाला भेटणार आहे"
हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं असेल.नम्रता कधी घरी जातेय आणि मुलाला घट्ट मिठी मारतेय असं तिला वाटतंय हे साहजिकच आहे. चिमुकल्यापासून अनेक दिवस झाले ती दूर आहे त्यामुळे आईचं मन व्याकूळ झालं आहे. नाटकाचे सर्व कलाकार आता लवकरच भारतात परत येणार आहेत.