'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सर्वांना खळखळून हसवणारी 'लॉली' म्हणजेच नम्रता संभेरावने (Namrata Sambherao) नुकताच वाढदिवस साजरा केला. नम्रताचे लाखो चाहते आहेत ज्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. तसंच इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनीही तिला शुभेच्छा दिल्या. नम्रता तिला मिळणारं हे प्रेम बघून अक्षरश: भारावून गेली आहे. तिने सर्वांचे आभार मानत एक खास पोस्ट शेअर केली आहे.
नम्रता संभेरावने पांढऱ्या ड्रेसमध्ये सुंदर फोटो शेअर केले आहेत. यासोबत तिने लिहिले, "मी खूप नशीबवान समजते स्वतःला, माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणारी माणसं आहेत , माझ्या आयुष्यात माझ्या आजूबाजूला. आपण कोणासाठी इतके special आहोत हे bday च्या दिवशी आणखी अधोरेखित होतं आणि मग अजून उत्साह वाढतो ऊर्जा मिळते. वेळात वेळ काढून मला सगळ्यांनी wish केलं स्टोऱ्या टाकल्या post केल्या message केले कॉल केले भरभरून शुभेच्छा दिल्या आणि gifts आले भरपूर. असाच वर्षाव करा प्रेमाचा आपुलकीचा कारण कौतुक प्रेम प्रत्येकाला हवं असत. आयुष्यात जगण्यात सुखाची आणि आनंदाची अधिक भर पडते"
नम्रताचा पती योगेश संभेरावने अभिनेत्रीचा फोटो शेअर करत तिला खास शुभेच्छा दिल्या होत्या. "नमा, तू नेहमी प्रमानेच सदैव हस्यमय राहो, तुझी सगळी स्वप्न सत्यात उतरू दे, तुझ्या सुख दु:खात मी तुझ्या सोबत आहे, आजपासून पुढील सगळे दिवस खूप यशाचे जाओ, माझा चेहरा पाहून माझ्या मनातले अचूक ओळखणाऱ्या माझ्या प्रिय बायको नम्रता तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...", अशा शब्दात योगेशने भावना व्यक्त केल्या. योगेश आणि नम्रता यांना रुद्राज हा मुलगाही आहे. नम्रता अनेकदा त्याच्यासोबतचे फोटो शेअर करत असते.