Join us

"२५ वर्षांनंतर मी केबीसी करेन...", बिग बींसोबत नाना पाटेकरांचा दिलखुलास संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 11:50 IST

'मै जिंदगी का साथ निभाता चला गया', अमिताभ बच्चन यांच्यासाठी गायलं गाणं

अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) आगामी 'वनवास' सिनेमात दिसणार आहेत. काही दिवसात सिनेमा रिलीज होणार आहे. त्याआधी नाना पाटेकर अनेक ठिकाणी मुलाखती देत आहेत. दरम्यान त्यांनी सिनेमाच्या प्रमोशननिमित्त कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि नाना पाटेकर यांच्यात चांगल्याच गप्पा रंगल्या. हे पाहताना प्रेक्षकांनाही मजा आली. यावेळी नानांनी २५ वर्षांनंतर मी केबीसी सांभाळेन असं म्हटलं.

केबीसी चा नवीन प्रोमो आला आहे. नाना पाटेकर हॉटसीटवर बसले आहेत. खेळातून जिंकलेली रक्कम नाना त्यांनीच सुरु केलेल्या 'नाम फाऊंडेशन' ला देणार आहेत. दरम्यान प्रोमोमध्ये नाना आणि अमिताभ एकमेकांसोबत दिलखुलासपणे गप्पा मारत आहेत. दोघं मिळून 'मै जिंदगी का साथ निभाता चला गया' हे गाणंही गातात आणि एकमेकांना मिठी मारताना. त्यांच्यातली ही मैत्री पाहण्यासारखी आहे. तर दुसऱ्या प्रोमोमध्ये नाना 'वेलकम'मधला डायलॉग ऐकवतात. 'भगवान का दिया सबकुछ है, बंगला है, गाडी है, तुम्हारे पास क्या है?' यावर बिग बी म्हणतात, 'आज तो मेरे पास नाना पाटेकर है'. यानंतर सगळेच हसतात. पुढे नाना म्हणतात,"पुढचे २५ वर्ष तुम्ही केबीसी सांभाळा. त्यानंतर मी सांभाळेन." त्यांच्या या वाक्यावर अमिताभ बच्चन खळखळून हसतात. 

अमिताभ बच्चन १५ वर्षांपासून केबीसी शो होस्ट करत आहे. या शोने त्यांना पैसा, प्रसिद्धी आणि चाहत्यांचं खूप प्रेम मिळालं. कार्यक्रमातून त्यांच्या हिंदी भाषेवरचं प्रभूत्व आणखी अधोरेखित झालं. नाना पाटेकर आणि अमिताभ बच्चन दोघांनी १९९९ साली 'कोहराम' सिनेमात एकत्र काम केलं होतं.  त्यानंतर आजच ते एकत्र स्क्रीनवर दिसले.

टॅग्स :नाना पाटेकरअमिताभ बच्चनकौन बनेगा करोडपतीटेलिव्हिजन