मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) चर्चित कलाकारांपैकी एक आहेत. नाना पाटेकर यांनी त्यांच्या कारकीर्दीत एकापेक्षा एक दमदार सिनेमात काम केले आहे. ज्यात क्रांतीवीर, तिरंगा, यशवंत, वेलकम आणि अब तक छप्पन या चित्रपटांचा समावेश आहे. नाना पाटेकर आपल्या दमदार अभिनयासोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिले आहेत. एकेकाळी नाना पाटेकर यांचे नाव अभिनेत्री मनिषा कोईराला(Manisha Koirala)सोबत जोडले गेले होते. मात्र एका अभिनेत्रीमुळे त्या दोघांच्या नात्यात कायमचा दुरावा आल्याचे सांगितले जाते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नाना पाटेकर आणि मनिषा कोईराला यांच्यातील जवळीकता अग्निसाक्षी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान वाढली होती. हा चित्रपट १९९६ साली रिलीज झाला होता आणि असं सांगितलं जातं की या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते एकमेकांच्या जवळ आले होते. याच वर्षी म्हणजेच १९९६ साली रिलीज झालेला खामोशी चित्रपटात नाना पाटेकर आणि मनिषा कोईराला बाप लेकीच्या भूमिकेत दिसले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट रिलीज होईपर्यंत त्यांच्या अफेयरची चर्चा पूर्ण इंडस्ट्रीत होऊ लागली होती.
याच घटनेनंतर मनिषा आणि नाना यांचे झाले ब्रेकअपमीडिया रिपोर्ट्सनुसार, नाना पाटेकर यांचं मनीषा कोईरालाच्या घरी येणे-जाणे होते. मात्र असे काय झालं की, नाना पाटेकर आणि मनिषा कोईराला यांचं ब्रेकअप झालं होतं? असं सांगितलं जातं की नाना पाटेकर यांनी मनिषाची प्रेमात फसवणूक केली होती. मनिषा कोईरालाने नाना पाटेकर यांना आएशा जुल्कासोबत रंगेहाथ पकडले होते. याच घटनेनंतर मनिषा आणि नाना यांचे ब्रेकअप झाले होते, असे सांगितले जाते.