Join us

नरेंद्र आणि भाग्यश्रीची जमली जोडी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 8:00 AM

अनेक चित्रपटातून नायकांच्या वेगवेगळ्या जोड्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. प्रयोगशील दिग्दर्शक वेगवेगळ्या जोड्यांच्या माध्यमातून चित्रपटाच्या कथानकाला खुलवण्याचा प्रयत्न करत असतात.

ठळक मुद्देनरेंद्र देशमुख यांनी कृष्णा पाटील तर भाग्यश्री मोटे हिने पुष्पा वाघमारे ही व्यक्तिरेखा साकारली आहे.चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन संतोष राममीना मिजगर यांचे आहे

अनेक चित्रपटातून नायकांच्या वेगवेगळ्या जोड्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. प्रयोगशील दिग्दर्शक वेगवेगळ्या जोड्यांच्या माध्यमातून चित्रपटाच्या कथानकाला खुलवण्याचा प्रयत्न करत असतात. असाच यशस्वी प्रयत्न संतोष राममीना मिजगर यांनी त्यांच्या पाटील या चित्रपटात केला आहे. नरेंद्र आणि भाग्यश्री ही जोडी ‘पाटील...संघर्ष प्रेम आणि अस्तित्वाचा’ या चित्रपटातून पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

या चित्रपटात नरेंद्र देशमुख यांनी कृष्णा पाटील तर भाग्यश्री मोटे हिने पुष्पा वाघमारे ही व्यक्तिरेखा साकारली आहे. सामाजिक, वैचारिक भेदांची पर्वा न करता आपल्या प्रेमाप्रती एकनिष्ठ राहून समाजासमोर एक नवा आदर्श ठेवतात. पण हे करत असताना त्यांना वेगवेगळ्या टप्प्यांवर कोणकोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागते आणि आलेल्या संकटांवर ते एकमेकांच्या साथीने कशाप्रकारे तोंड देतात यांची कथा आपल्याला ‘पाटील’ या सिनेमातून दाखवण्यात आले आहे. एकमेकांच्या भूमिकांना अधिक खुलवणारा अभिनय या दोघांनी केल्यामुळे ही नवीन जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन संतोष राममीना मिजगर यांचे आहे. स्टार क्राफ्ट मनोरंजन प्रा.लि., साचिकेत प्रोडक्शन्स, शौभम सिनेव्हिजन्स प्रा.लि. यांनी या  चित्रपटाची निर्मिती केली आहे. बॉलीवूड टुरिझम आणि ‘ए व्ही के एंटरटेन्मेंट’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. सांगली, कोल्हापूर, नाशिक,औरंगाबाद,अमरावती, हिंगोली, नागपूर या शहरांतून  ‘पाटील’ चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळतोय. येत्या ४ जानेवारीपासून ‘पाटील’ राज्यातल्या इतर शहरांतूनही धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे.

टॅग्स :पाटील