इम्तियाज अली(Imtiaz Ali)चा सुपरहिट चित्रपट 'रॉकस्टार'मधून प्रेक्षकांमध्ये आपली छाप पाडणारी अभिनेत्री नरगिस फाखरी (Nargis Fakhri)या चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतरही नरगिस चर्चेत आली होती तेही तिचा बॉयफ्रेंड उदय चोप्रा (Uday Chopra)सोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे. मात्र आता त्यांचे ब्रेकअप झाले आहे. दरम्यान आता नरगिस पुन्हा प्रेमात पडली असल्याचे बोलले जात आहे.
नरगिस फाखरी अनेक वर्षांपासून उदय चोप्रासोबत रिलेशनशिपमध्ये होती. एका मुलाखतीदरम्यान तिने उदयचे कौतुक करताना सांगितले की, मी उदयसोबतचे माझे नाते लपवले नाही पाहिजे, मी त्याच्यासोबत खूप खूश आहे. परंतु काही काळानंतर नरगिसचे उदय चोप्रासोबत ब्रेकअप झाले आणि दोघेही वेगळे झाले.
अमेरिकन दिग्दर्शकासोबत नरगिस होती रिलेशनशीपमध्येब्रेकअपनंतर नरगिस कोलमडून गेली होती. मात्र तिला अमेरिकेन दिग्दर्शक जस्टिन सँटोसने साथ दिली. सुरुवातीला दोघांमध्ये चांगले संबंध होते, मात्र काही परिस्थितींमुळे नरगिसने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जस्टिनसोबत ब्रेकअप केले.
नरगिस सध्या आहे लॉस अँजेलिसमध्येमीडिया रिपोर्टनुसार, नरगिसला पुन्हा तिचे प्रेम मिळाल्याचे बोलले जात आहे. ती सध्या अमेरिकेतील लॉस अँजेलिसमध्ये आहे. एका न्यूज पोर्टलच्या रिपोर्टनुसार, ती काश्मीरमधील टोनी बॅगसोबत दिसली आहे. तो लवकरच उद्योजक बनणार आहे. सूत्रानुसार, दोघांना रोज भेटावे लागते. कंपनीतून जाताना दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवतात. मात्र, नरगिस याबाबत कोणालाच सांगायचे नाही आणि ती टोनीसोबत लोकांसमोरही येत नाही.