Join us

नसीरुद्दीन यांनी 'अ वेनस्डे' ची स्क्रीप्ट पाहून विचारलं, "सिनेमात प्रत्येक दहशतवादी मुस्लिमच का?"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2023 10:35 AM

'अ वेनस्डे' सिनेमात नसीरुद्दीन शाह यांचं पात्र नेहमी रहस्यमय वाटतं.

2008 साली रिलीज झालेली 'अ वेनस्डे' (A Wednesday) फिल्म आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. नीरज पांडेचा (Neeraj Pandey) हा पहिलाच सिनेमा.कोणताही मिर्चमसाला नाही पण तरी प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी ही फिल्म आहे. सिनेमात अनुपम खेर (Anupam Kher) आणि नसीरुद्दीन शहा (Naseeruddin Shah) मुख्य भूमिकेत आहेत. नीरज पांडेला या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. सिनेमातून नीरजने चांगला संदेश दिला होता. प्रेक्षकांनीही फिल्मला डोक्यावर घेतले. फिल्म नंतर तेलुगू आणि तमिळ मध्येही डब झाली.

सिनेमात नसीरुद्दीन शाह यांचं पात्र नेहमी रहस्यमय वाटतं. खूप कौशल्याने त्यांनी हे पात्र साकारलं . पण नसीरुद्दीन कदाचित या सिनेमाचा भाग नसले असते कारण फिल्मची स्क्रीप्ट सहा महिने त्यांच्या टेबलवर फक्त पडून होती. लल्लनटॉपशी बातचीत करताना ते म्हणाले, "अ वेनस्डे ची स्क्रीप्ट सहा महिने माझ्या टेबलवर पडून होती. बाकी स्क्रीप्ट्सच्या खाली दबली होती. एक दिवस अचानक त्यावर नजर पडली. वाचून बघितली तर चांगली वाटली. छोटी होती पण आवडली. फिल्म सुपरहिटही झाली."

ते पुढे म्हणाले, "फिल्ममध्ये बहुतेक एक संदेश लपलेला होता. यामध्ये सगळे दहशतवादी मुस्लिम होते. नीरजला मी विचारलं की हे असं जाणूनबुजून करण्यात आलंय का. तमिळ का नाही ठेवला त्याजागी. तर नीरज म्हणाला, नाही नाही असं नाहीए. यात काहीच राजकीय हेतू नाही." सिनेमात नसीरुद्दीन यांचं पात्र ४ दहशतवाद्यांना सोडवतो. त्यामुळे ते दहशतवाद्यांच्या बाजूनेच आहेत असं पोलिसांना वाटतं. मात्र त्यांना सोडवल्यानंतर ते पात्र चारही दहशतवाद्यांना बॉम्बने उडवतो.

नसीरुद्दीन शाह नुकतेच 'ताज : डिव्हायडेड बाय ब्लड' सिरीज मध्ये दिसले. यात त्यांनी अकबरची भूमिका साकारली. सीरिज अनेकांच्या पसंतीस पडली आहे. 

टॅग्स :नसिरुद्दीन शाहसिनेमादहशतवादीमुस्लीम