नसीरूद्दीन शाह यांना झालाय ‘हा’ विचित्र आजार; ना शांत झोप, ना विश्रांती अशी झालीये अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 10:34 AM2022-03-07T10:34:38+5:302022-03-07T10:36:02+5:30
Naseeruddin Shah medical condition : खुद्द नसीरूद्दीन यांनीच एका मुलाखतीत हा खुलासा केला. त्यांच्या या आजाराबद्दल ऐकून त्यांचे चाहतेही चिंतीत झाले आहेत.
आपल्या सहजसुंदर अभिनयानं गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे बॉलिवूडचे ज्येष्ठ नेते नसीरूद्दीन शाह (Naseeruddin Shah) सध्या एका विचित्र आजाराशी झुंज देत आहेत. खुद्द नसीरूद्दीन यांनीच एका मुलाखतीत हा खुलासा केला. नसीर यांना ‘Onomatomania’ या आजाराने ग्रासलं आहे. त्यांच्या या आजाराबद्दल ऐकून त्यांचे चाहतेही चिंतीत झाले आहेत.
‘ Chalchitra Talks’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत नसीर यांनी त्यांच्या आजाराबद्दल सांगितलं. ‘मला ओनोमॅटमानिया हा आजार आहे. या आजारामुळे मी मनात असूनही शांत राहू शकत नाही. प्रयत्न करूनही मी शांत झोपू शकत नाही. या आजारात माणूस बोलता बोलता एका वाक्यावर थांबतो आणि पुन्हा पुन्हा तेच वाक्य बोलत राहतो. ओनोमॅटोमानिया आजारात एखादा शब्द, वाक्य, कविता, भाषण असं व्यक्ती सारखं सारखं बोलत राहतो, अगदी कोणत्याही कारणाशिवाय. मी मस्करी करत नाहीये. हा आजार आहे. डिक्शनरीत तुम्ही तो शोधू शकता. अलीकडे यामुळे मी शांतपणे विश्रांतीदेखील घेऊ शकत नाही. मी झोपेतही या आजाराचा सामना करतो. मी झोपेत अचानक उठतो आणि माझ्या घरातल्या एखाद्या आवडीच्या कोपºयात सारखा जाऊन बसतो. कोणी मला तिथून उठवून झोपवलं तरी मी वारंवार ती कृती करीत राहतो. त्याक्षणी मला काहीही आठवत नाही. मी आता झोपलो होतो किंवा रात्रीचे किती वाजले, याचं भान विसरतो. सध्या मी अशा अवस्थेतून जात आहे,असं त्यांनी सांगितलं.
नसीरूद्दीन शाह अलीकडे शाहिद कपूरच्या बहिणीच्या लग्नात दिसले होते. अलीकडे ते ‘गहराइंयां’ या सिनेमात दिसले होते. या चित्रपटात त्यांनी दीपिका पादुकोणच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. ‘कौन बनेगा शिखरवती’ या वेबसिरीजमध्ये देखील ते दिसले होते.
नसीरूद्दीन यांनी 1975 साली ‘निशांत’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पर्दापण केलं होतं. आपल्या 47 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये त्यांनी 100 पेक्षा अधिक चित्रपटांत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या.