Join us

हिंदीनंतर नसीरुद्दीन शहांचा साऊथ चित्रपटांवर निशाणा, म्हणाले, 'RRR, पुष्पा कधीच नाही पाहणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 09:03 IST

मणिरत्नम यांच्या सिनेमाचं कौतुक तर RRR, पुष्पावर केली टीका

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांचा अभिनय म्हणजे स्वत:मध्येच एक युनिव्हर्सिटी आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते इतर सिनेमांबाबतीतील वक्तव्यांमुळे जास्त चर्चेत आहेत. 'द केरळ स्टोरी', 'द काश्मीर फाईल्स', 'गदर 2' सारख्या सिनेमांवर टीका केल्यानंतर आता शाह यांनी 'पुष्पा', 'RRR' या साऊथ सिनेमांवरही निशाणा साधलाय. हे दोन्ही चित्रपट पाहूच शकत नाही असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

नसीरुद्दीन शाह नुकतंच वी आर युवाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले,'रामप्रसाद की तेरहवी','गुलमोहर' सारख्या छोट्या सिनेमांना त्यांची जागा मिळेल. मला नवीन पिढीवर पूर्ण विश्वास आहे. ते खूपच सुधारलेले आहेत आणि त्यांना जास्त नॉलेज आहे. थ्रिलशिवाय तुम्हाला आणखी काय मिळेल याची मी कल्पनाही करु शकत नाही.'

ते पुढे म्हणाले,'मी आरआरआर पाहण्याचा प्रयत्न केला पण नाही पाहू शकलो. पुष्पा सुद्धा बघत होतो पण नाही जमलं. असे चित्रपट पाहून मी थ्रिलशिवाय आणखी काही कल्पना करु शकत नाही. मी मणिरत्नम यांचा सिनेमा पाहिला कारण ते खूप चांगले फिल्ममेकर आहेत आणि त्यांचा कोणताही अजेंडा नाही. आपल्या मनात ज्या भावना आहेत त्यांना फीड करुन एक वेगळाच आनंद मिळतो आणि तो बरेच दिवस टिकतो. मी RRR, पुष्पासारखे चित्रपट कधी पाहायला नाही जाणार.'

टॅग्स :नसिरुद्दीन शाहआरआरआर सिनेमापुष्पा