95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला दिमाखात सुरुवात झाली आहे. संपूर्ण भारताचं या सोहळ्याकडे लक्ष लागलंय. एस एस राजामौली (SS Rajamauli) यांच्या 'आरआरआर' (RRR) सिनेमातील 'नाटू नाटू' (Natu Natu) या गाण्याला बेस्ट ओरिजिनल सॉंग च्या कॅटेगरीत नामांकन मिळालं आहे. या पुरस्कार सोहळ्यात गायक काल भैरव (Kaal Bhairav) आणि राहुल सिपलीगुंज (Rahul Sipligunj) यांनी स्टेजवर 'नाटू नाटू' हे गाणं गात प्रेक्षकांची दाद मिळवली. या गाण्याची एनर्जीच इतकी आहे की त्यांना प्रेक्षकांकडून स्टॅंडिंग ओव्हेशनही मिळालं.
ऑस्करमध्ये घुमला 'नाटू नाटू'चा आवाज
या परफॉर्मन्सची घोषणा बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) केली. दीपिकाने 'आरआरआर' फिल्म आणि 'नाटू नाटू' गाण्याची स्तुती केली. यावेळी ऑडियन्सने चिअर केले. 'नाटू नाटू' चा उल्लेख होताच टाळ्यांचा कडकडाट झाला. यामुळे दीपिकाही बोलताना अडखळत होती. ऑस्कर्समध्ये भारतीयांना मिळणारी ही दाद कौतुकास्पद आहे. दीपिकाच्या चेहऱ्यावरही तो आनंद दिसला.
अभिनेता राम चरण (Ramcharan) आणि ज्युनियर एनटीआर (Jr NTR) यांनी ऑस्कर 2023 पुरस्कार सोहळ्यासाठी ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसले. तर दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी जांभळा कुर्ता आणि धोती अशा ट्रेडिशन लूक केला आहे.