दिग्दर्शक एस एस राजामौली (SS Rajamouli) यांच्या 'आरआरआर' (RRR) सिनेमाने आज इतिहास रचला आहे. ९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सिनेमातील 'नाटू नाटू' (Natu Natu) गाण्याचा आवाज घुमला आहे. काल भैरव आणि राहुल सिपलीगुंज या जोडीने मंचावर गाणं गात प्रेक्षकांची दाद मिळवली. या गाण्याची एनर्जीच इतकी होती की प्रेक्षकांनी परफॉर्मन्सनंतर स्टॅंडिंग ओव्हेशनही दिले. मात्र 'नाटू नाटू'चा अर्थ नेमका काय असा प्रश्न अनेकांना पडला असेल. याचंच उत्तर संगीत दिग्दर्शक एमएम कीरावानी आणि लेखक चंद्रबोस यांनी दिलं आहे.
'नाटू नाटू' साठी ऑस्कर पुरस्कार स्वीकारल्यानंतर एमएम कीरावानी यांनी तेलुगू शब्द असलेल्या 'नाटू' या शब्दाचा आणि एकंदर गाण्याचा थोडक्यात अर्थ सांगितला आहे. तसंच गाण्याची प्रेरणा कुठून मिळाली हे देखील त्यांनी यावेळी सांगितलं. अकादमी अवॉर्ड्सच्या कार्पेटवर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, 'नाटू नाटू हे गीत दाक्षिणात्य संगिताचं मूळ रुप दर्शवणारं आहे. गाण्याला रस्टिक टेक्स्चर आहे. तर चंद्रबोस म्हणाले, माझ्या गावातील आलेल्या अनुभवातून प्रेरणा घेऊन मी हे बोल लिहिले आहेत.'
'नाटू नाटू' गाण्याचा नेमका अर्थ काय ?
'नाटू' या शब्दाचा अर्थ आहे नाचा (डान्स)
'नाटू नाटू' म्हणजेच चला सगळे मिळून नाचूया असा त्याचा अर्थ होतो.
सुरुवातीला 'ना पाटा सोडू' असं आहे म्हणजेच 'माझं गाणं ऐका आणि नाचायला या' असा त्याचा अर्थ आहे.
गाण्याच्या पहिल्या कडव्यात तुम्ही प्राणीपक्षी जसे बिंधास्त आकाशात झेप घेतात तसं नाचा असं म्हटलं आहे
तर दुसऱ्या कडव्यात ढोल ताशांच्या गजरात एकरुप होऊन नाचा असं संबोधित केलं आहे.
आणि तिसऱ्या कडव्यात पृथ्वीवरची धूळ आकाशापर्यंत पोहोचली पाहिजे असं नाचा हे सांगितलं आहे.
'नाटू नाटू' गाण्यासाठी स्टॅंडिंग ओव्हेशन! परफॉर्मन्सची घोषणा करताना अडखळली दीपिका पदुकोण
एकंदर मस्ती आणि जोशपूर्ण हे गाणं आहे. गाण्यावरील स्टेप्सही तितकेच जोशपूर्ण आहेत. उत्साह निर्माण करणारे आहेत. जो गाणं ऐकेल त्याचे पाय थिरकल्याशिवाय राहणार नाहीत असंच हे 'नाटू नाटू' गाणं आहे.