सध्या 'नवरी मिळे हिटलरला' (navari mile hitlerla) ही मालिका सध्या झी मराठीवर चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखांवर लोकांनी भरभरुन प्रेम केलंय. 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत सध्या रोमँटिक ट्रॅक सुरु आहे. कारण एजे आणि लीला थेट काश्मिरला भटकंती करण्यासाठी गेले आहेत. काश्मिरला गेल्यावर एजे आणि लीला अर्थात अभिनेता राकेश बापट आणि अभिनेत्री वल्लरी विराज यांचा पडद्यामागील एका व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओत शूटिंग करताना वल्लरी चांगलीच कुडकुडलेली दिसतेय. वल्लरी रोमान्स करताना गारठलीवल्लरी विराजने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत वल्लरी कडाक्याच्या थंडीत चांगलीच गारठलेली दिसतेय. एजे आणि लीला यांच्या रोमँटिक ट्रॅकचं शूटिंग करण्यासाठी सर्व कलाकार काश्मिरला गेले आहेत. त्यावेळी कडाक्याच्या थंडीत शूटिंग करताना 'नवरी मिळे हिटलरला'मधील लीलाची अवस्था खूपच मजेशीर झाली. शूटिंगमधून ब्रेक घेऊन कडाक्याच्या थंडीत ऊब मिळवण्यासाठी वल्लरी प्रयत्न करत होती. मालिकेच्या पडद्यामागील तंत्रज्ञांनी वल्लरीची अवस्था ओळखून तिला मदत केली.
'नवरी मिळे हिटलरला' मालिकेचा रोमँटिक ट्रॅक'नवरी मिळे हिटलरला' मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. एजेला लीलाच्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या आहेत आणि तिची प्रत्येक इच्छा कशी पूर्ण होईल याची खात्री करण्याचे तो ठरवतो. लीलाची इच्छा आहे की एजेने आपल्याला छान थंड प्रदेशात घेऊन जावं जिथे छान बर्फ असेल आणि बर्फाच्या मध्ये उभं राहून रोमँटिक डान्स करायचाय आणि तिला एक मस्त शिकारा राईडही करायची आहे. ह्या सगळ्या इच्छा एजे पूर्ण करणार आहे. कारण एजे आता खरंच लीलाच्या प्रेमात पडलाय. त्यामुळे पुढे मालिकेत काय बघायला मिळणार याची सर्वांना उत्सुकता आहे.