स्टार प्लस वाहिनीवरील ‘कानपूरवाले खुराणाज’ या मालिकेत विनोदाचा बादशहा सुनील ग्रोव्हर आपल्या जिजाच्या भूमिकेद्वारे प्रेक्षकांची चांगलीच करमणूक करीत आहे. २०१८ मधील प्रमुख घटनांचा आढावा घेणाऱ्या या कार्यक्रमाच्या आगामी भागात नामवंत अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकी आणि अभिनेत्री स्वरा भास्कर नुकतेच सहभागी झाले होते. या दोन्ही कलाकारांनी २०१८ हे वर्ष गाजविले होते.या कार्यक्रमाशी जवळून संबंधित असलेल्या एका सूत्राने सांगितले, “या आगामी भागात अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकी आणि अभिनेत्री स्वरा भास्कर हे सेलिब्रिटी अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. चित्रपटसृष्टीत नाव कमावण्यापूर्वी नवाजुद्दिन आणि सुनील ग्रोव्हर हे एकत्रच राहात होते. त्यामुळे या कार्यक्रमात त्यांची रियुनियन झाली म्हणायची.
नवाजुद्दिन सिद्दिकी आणि स्वरा भास्कर ह्या कारणामुळे आले एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 06:30 IST