Join us

नवाझुद्दीन सिद्दीकीची करण्यात आली कोरोना टेस्ट, घरातच काही दिवस राहाणार क्वारंटाईन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 12:55 PM

नवाझुद्दीन सिद्दीकीची दोन दिवसांपूर्वी कोरोना चाचणी करण्यात आली असून त्याला त्याच्या घरात क्वारंटाईन ठेवण्यात आले आहे.

ठळक मुद्देप्रेक्षकांच्या लाडक्या नवाझुद्दीनची नुकतीच कोरोना चाचणी करण्यात आली आहे. नवाझुद्दीनच्या शरीरात कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळत नसली तरी केवळ खबरदारी म्हणून त्याची चाचणी करण्यात आली आहे.

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. या व्हायरसमुळे भारतात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. नुकतीच एका बॉलिवूडमधील सेलिब्रेटीची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्याला त्याच्या घरात क्वारंटाईन ठेवण्यात आले आहे.

प्रेक्षकांच्या लाडक्या नवाझुद्दीन सिद्दीकीची नुकतीच कोरोना चाचणी करण्यात आली आहे. नवाझुद्दीनच्या शरीरात कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळत नसली तरी केवळ खबरदारी म्हणून त्याची चाचणी करण्यात आली आहे. लवकरच रमजान ईद असल्याने नवाझुद्दीन त्याच्या कुटुंबियांसोबत उत्तरप्रदेशमधील मुझ्झफरनगरमध्ये ईद साजरी करण्यासाठी गेला आहे. यासाठी त्याने खास महाराष्ट्र सरकारची परवानगी घेतली आहे. एसपी देहात नेपाल सिंहने अमर उजालाला दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी नवाझुद्दीन त्याच्या कुटुंबियांसोबत बुढाना येथील त्याच्या घरी पोहोचला आहे.

नवाझुद्दीन आणि त्याच्या कुटुंबियांची तिथे पोहोचताच कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असले तरी त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना सध्या घरातच क्वारंटाईन करण्यात आले आहे.

नवाझुद्दीन सिद्दीकीने आज त्याच्या मेहनतीच्या बळावर बॉलिवूडमध्ये त्याचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आजच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याचे नाव घेतले जाते. एवढेच नव्हे तर सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत तो चित्रपटांमध्ये झळकला आहे. नवाजुद्दीनचा बॉलिवूडमधील प्रवास अतिशय खडतर होता. तो एका छोट्याशा गावातून आलेला आहे. त्याच्या कुटुंबातील कोणाचाच या इंडस्ट्रीशी संबंध नव्हता. त्याची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होती. पण तरीही अभिनयक्षेत्रात यायचे असे त्याने अनेक वर्षांपूर्वीच ठरवले होते. त्यामुळे तो नशीब आजमवायला छोट्याशा गावातून मुंबईत आला. मुंबईत आल्यावर सुरुवातीला अनेक चित्रपटांमध्ये त्याने छोट्या भूमिका साकारल्या. सरफरोश, मुन्नाभाई एमबीबीएस यांसारख्या चित्रपटात तो छोट्याशा भूमिकांमध्ये दिसला.

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकीकोरोना वायरस बातम्या