Join us

'मंटो'मधील भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला दुसऱ्यांदा मिळाला 'हा' पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 20:20 IST

एशिया पॅसिफिक स्क्रीन अॅवॉर्डमध्ये दुसऱ्यांदा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याला सन्मानित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देनवाजसाठी 'मंटो' खास चित्रपट

१२ व्या एशिया पॅसिफिक स्क्रीन अॅवॉर्डमध्ये दुसऱ्यांदा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याला सन्मानित करण्यात आले आहे. त्याला हा पुरस्कार 'मंटो' या चित्रपटातील सर्वोत्कृष्ट भूमिकेसाठी मिळाला आहे. हे वृत्त खुद्द त्याने आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावर सांगितली व नवाजुद्दीनने 'मंटो' हा आपला आवडता चित्रपट असल्याचे म्हटले आहे.

हा पुरस्कार नवाजुद्दीनला दुसऱ्यांदा मिळत असल्यामुळे त्याच्यासाठी हा खास आहे. या चित्रपटात काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्याने दिग्दर्शिका नंदिता दासचे आभार मानले आहेत. 'मंटो' चित्रपटाचे प्रीमियर आंतरराष्ट्रीय स्तरावर झाले. प्रसिध्द लेखक सादत हसन मंटोच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे जगभरातील समिक्षक आणि प्रेक्षकांनी खूप कौतुक केले होते. हा चित्रपट या वर्षी सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित झाला होता. नवाजुद्दीनचा आगामी चित्रपट 'फोटोग्राफ' जगातील प्रतिष्ठीत सनडान्स फिल्म फेस्टीवल २०१९ साठी निवडण्यात आल्याचे त्याने सांगितले आहे. चित्रपटाच्या टीमला त्याने शुभेच्छाही दिल्या आहेत.

पुढील वर्षी २०१९मध्ये नवाजुद्दीन रुपेरी पडद्यावर विविध भूमिका साकारताना दिसणार आहे. तसेच त्याची गाजलेली वेबसीरिज सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सीझनची देखील चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. यात त्याने साकारलेला गणेश गायतोंडेने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडली आगे. यासोबत नवाज मोतीचूर चकनाचूरमध्ये अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत रोमांस करताना दिसणार आहे. याशिवाय दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेत देखील नवाज आपल्याला दिसणार आहे. त्यामुळे आगामी वर्ष नवाजसाठी खास असणार, हे नक्की.

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकीमंटोनंदिता दास