नवाझुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता. आजवर विविध भूमिका साकारुन नवाझुद्दीनने बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं. नवाझुद्दीनने अलीकडेच एका मुलाखतीत कलाकारांच्या दिसण्यावर त्यांना इतरांकडून ज्या प्रतिक्रिया ऐकाव्या लागतात, त्यावर भाष्य केलंय. नवाझने स्मिता पाटील यांचं (Smita Patil) उदाहरण देऊन अभिनय करताना कलाकारांचं दिसणं महत्वाचं असतं का? यावर त्याचं स्पष्ट मत सांगितलंय.
नवाझने स्मिता पाटीलचं उदाहरण देत त्याचं मत मांडलंय. तो म्हणाला, "एखादा व्यक्ती चांगला दिसणं यावर भारतात वेगवेगळी मतं मांडली जातात. एखादी व्यक्ती भारतात दिसायला चांगला आहे, असा समज असतो तीच व्यक्ती फ्रांस किंवा जर्मनी मध्ये लोकांना आवडू शकत नाही. आपल्याकडे काही खास वर्णाच्या आणि शरीरयष्टीच्या व्यक्तींनाच सुंदर समजलं जातं. पण माझ्या मते स्मिता पाटील सारखी सुंदर अभिनेत्री मी पाहिली नाही."
नवाझ पुढे म्हणाला, "स्मिता पाटीलला पाहून असं वाटतं की त्यांचा जन्म फक्त अभिनय करण्यासाठीच झाला असावा. स्मिता पाटीलकडे तुम्ही पाहिलं तर वरवर त्या एक सामान्य महिला वाटू शकशील. पण जेव्हा त्या कॅमेरासमोर अभिनय करतात तेव्हा त्यांच्याइतकी सुंदर कोणी दिसत नाही. आज त्या असत्या तर अनेक आंतरराष्ट्रीय निर्मात्यांनी त्यांना जागतिक सिनेमात करारबद्ध केलं असतं."