रितेश बत्राच्या फोटोग्राफ सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी फोटोग्राफरची भूमिका साकारणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी नवाजने खऱ्या फोटोग्राफरच्या आयुष्याकडून प्रेरणा घेतली आहे. फोटोग्राफर्सना ट्रिब्यूट देण्यासाठी या सिनेमाचा एक विशेष शो सिनेमाच्या टीमकडून आयोजित करण्यात आला होता.
सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाचे वर्ल्ड प्रीमियर झाले. तसेच बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील हा सिनेमा दाखवणयात आला आहे.
रितेश बत्रा यांचा हा सिनेमा धारावीमधल्या एका फोटोग्राफरवर आधारित आहे. नवाज रितेश बत्रांसोबत दुसऱ्यांदा काम करतोय तर सान्या पहिल्यांदाच. सान्या मल्होत्रा म्हणाली होती की, ''फोटोग्राफ'मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत काम करणे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. कारण नवाजुद्दीन हा माझा आवडता अभिनेता असल्याने त्याच्यासोबत काम करण्याचे माझे स्वप्न पूर्ण होत आहे.' पुढे ती म्हणाली, चित्रपटाची शुटिंग सुरू झाल्यानंतर सुरूवातीला मी थोडी नर्व्हस होते. पण, त्यानंतर मी त्यांचे सर्व इंटव्यू पाहिले. त्यात ते कशा प्रकारे आपली भूमिका साकारतात, याचे निरिक्षण केले. त्यामुळे मला त्यांच्यासोबत काम करताना थोडा आत्मविश्वास मिळाला, असे तिने सांगितले. सान्या मल्होत्रा व नवाजुद्दीन सिद्दीकीच्या भूमिकेबद्दल अद्याप काहीही समजू शकलेले नाही. मात्र त्यांची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर कशी वाटते, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 15 मार्चला हा सिनेमा रिलीज होणार आहे.