प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. नयनताराने पती विघ्नेश शिवणला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केलं होतं. त्यामुळे त्या दोघांमध्ये बिनसल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. नयनताराने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक क्रिप्टिक पोस्टही शेअर केली होती. त्यामुळे तिच्या संसारात वादळ आल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चेदरम्यानच नयनताराचा पती विग्नेश शिवणने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.
नयनताराने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत "डोळ्यांत अश्रू असले तरीही ती म्हणेल की मला हे मिळालं आहे," असं म्हटलं होतं. तिच्या या पोस्टमुळे विग्नेश आणि तिच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जात होतं. पण, या चर्चांना आता विग्नेशने पूर्णविराम दिला आहे. विग्नेशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन नयनताराचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती हातात फुलं घेऊन पोझ देताना दिसत आहे. एका ब्युटी प्रोडक्टसंदर्भात ही पोस्ट आहे. त्यामुळे त्यांच्यात सर्वकाही आलबेल असल्याचं समोर आलं आहे. आता नयनतारा आणि विग्नेश दोघेही इन्स्टाग्रामवर एकमेकांना फॉलो करत आहेत.
नयनतारा आणि विग्नेश २०१५ साली 'नानुम राउडी' या सिनेमाच्या सेटवर पहिल्यांदा भेटले होते. त्यानंतर त्यांच्यात जवळीक वाढली. ६ वर्षांच्या डेटिंगनंतर नयनतारा आणि विग्नेशने लग्न करण्याचा निर्णय घेतला. २०२२मध्ये ते लग्नाच्या बेडीत अडकले होते. त्यानंतर सरोगसी पद्धतीने त्यांना जुळी मुले झाली आहेत.