दोन महिन्यांआधी सुशांत केसमधील ड्रग्स प्रकरणात काही मीडिया हाउसेसनी अभिनेत्री रकुलप्रीतचं नाव घेतलं होतं. त्यानंतर रकुलप्रीतने हायकोर्टात एक याचिका दाखल केली की, तिच्या विरोधात न्यूज आणि आर्टिकल प्रकाशित करू नये. कोर्टाने यातील मंत्रालयासहीत केसशी संबंधित दुसऱ्या लोकांना हे आदेश दिले होते की, त्यांनी यादृष्टीने उचलण्यात आलेल्या पावलांबाबत सांगावे.
आता या केसवर कारवाई करत न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टॅंडर्ड्स अथॉरिटीने काही चॅनल्सना फटकारले आहे. या चॅनल्सनी तिच्याविरोधात बातम्या दाखवल्या होत्या. NBSA या चॅनल्सना १७ डिसेंबरपर्यंत ऑनएअर माफी मागण्याचे आदेश दिले आहेत. यात NBSA ने तीन चॅनल्सना माफी मागण्याचे आदेश दिले आहेत. यात झी न्यूज, झी २४ आणि झी हिंदुस्थान यांचा समावेश आहे.
NBSA नुसार चॅनल्सना टेक्स्ट दाखवावं लागेल. ज्यात लिहिलेलं असेल की, 'आम्ही रिया चक्रवर्तीच्या ड्रग केस प्रकरणाची तपास रिपोर्टमध्ये ज्याप्रकारे हॅशटॅग/टॅगलाइन आणि इमेजेस टेलीकास्ट केले होते त्यासाठी माफी मागतो. या टेलीकास्टने नैतिकता आणि प्रसारण नियमांचं केलं. आम्ही स्पष्ट करतो की, हे मुद्दे खळबळजनक बलण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारची चौकशी पूर्वग्रहाने प्रभावित करण्याचा आमचा उद्देश नव्हता'.