Join us  

यशस्वी होण्यासाठी थोडा वेडेपणा हवाच!

By admin | Published: March 23, 2016 1:41 AM

आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी थोडे वेडेच असावे लागते आणि जाहिरातपट निर्माते प्रह्लाद कक्कर (पीके) यांच्याकडे असेच वेड आहे. त्यामुळेच ते सर्जनशील कलावंत आहेत

आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी थोडे वेडेच असावे लागते आणि जाहिरातपट निर्माते प्रह्लाद कक्कर (पीके) यांच्याकडे असेच वेड आहे. त्यामुळेच ते सर्जनशील कलावंत आहेत, असे कौतुकोद्गार बॉलिवूड अभिनेता विवेक आॅबेरॉय याने काढले. पीके यांच्या नव्या ब्रँडिंग आणि एंटरप्रेन्युअरशीप शिक्षणसंस्थेच्या उद्घाटनप्रसंगी विवेक मुंबईत बोलत होता.यावेळी विवेकने त्याच्या नव्या ग्रेट ग्रँड मस्ती आदी चित्रपटांबद्दल आणि ड्रामेबाज या मालिकेबद्दल माहिती दिली. तसेच लवकर स्वत:चे पॉडक्शन हाऊस सुरू करणार असल्याचेही सांगितले. या कार्यक्रमाला अभिनेता जावेद जाफरी, ज्येष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी, शिक्षणतज्ज्ञ लीना आशर, दिग्दर्शक सुभाष घई आदी मान्यवर उपस्थित होते. समाजात आर्थिक गरिबीपेक्षाही सर्जनशीलतेचे दारिद्रय अधिक असल्याचे दिसून येते. कौशल्य आणि सर्जनशीलतेला उत्तेजन देण्यासाठीच विसलिंगवूडने पीके यांची शिक्षणसंस्था भागीदारीत सुरू केली आहे, अशी माहिती विसलिंगवूड इंटरनॅशनल या संस्थेचे संस्थापक सुभाष घई यांनी दिली.