बॉलिवूडची अभिनेत्री नीना गुप्ता यांचा आज वाढदिवस आहे. त्या ६० वर्षांच्या झाल्या आहेत. नीना गुप्ता इंडस्ट्रीतील या अभिनेत्रींपैकी आहेत ज्यांनी गंभीर ते फनी भूमिका सक्षमपणे साकारल्या आहेत. नीना गुप्ता यांच्या जीवनात खूप चढउतार आले होते. मात्र त्या महिलांसाठी आदर्श व्यक्तीमत्त्व आहे. त्यांना आपल्या अटींवर जीवन जगायचं आहे.
८०च्या दशकात नीना गुप्ता यांचं नाव अभिनेते आलोक नाथ यांच्यासोबत जोडलं गेलं होतं. मात्र त्यांचं रिलेशनशीप जास्त काळ टिकू शकलं नाही. रिपोर्टनुसार, नीना यांचं नाव भारतीय शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या मुलासोबतही जोडलं गेलं होतं. दोघांनी एकत्र कामदेखील केलं आणि एकमेकांवर प्रेम करत होते. मात्र हे नातं जास्त काळ टिकू शकलं नाही आणि ते दोघे वेगळे झाले.
ऐंशीच्या दशकात वेस्ट इंडिजची टीम काही सामन्यांसाठी भारतात आली होती. त्यावेळी या संघात प्रसिद्ध क्रिकेटर विवियन रिचर्ड्सदेखील सहभागी होता. त्यावेळी विवियनचं लग्नदेखील झालं होतं आणि त्याला दोन मुलेदेखील होते. मात्र अशीदेखील बातमी होती की तो आपल्या पत्नीपासून वेगळा होऊन आपल्या गर्लफ्रेंडसोबत राहत होता. रिचर्ड्स भारतात आला तेव्हा मुंबईत एका पार्टीत नीना गुप्ता यांच्याशी भेट झाली. त्यानंतर दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले होते. दोघांचे नाते खुप चर्चेत राहिले होते. त्यानंतर नीना गुप्ता प्रेग्नेंट असल्याची वृत्त वाऱ्यासारखे पसरले आणि हे वृत्त खरे ठरले. नीना यांचे लग्न झाले नव्हते. त्यामुळे बाळाला जन्म देणं कठीण होतं. मात्र तरीदेखील त्यांनी बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. तिने आपल्या कुटुंबाविरोधात जाऊन आपल्या मुलीला जन्म दिला. जिचं नाव तिनं मसाबा गुप्ता ठेवलं.
नीना गुप्ता यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांना जीवनातील काही गोष्टींचा पश्चाताप होतो. त्या म्हणाल्या की, मी योग्य वयात लग्न करून कुटुंबाचे नियोजन करायला हवे होते. त्यांनी पुढे सांगितलं की, मी लग्नाबाबत कधीच उत्साहित नव्हते. पण जेव्हा मुलगी मोठी झाली तर एकटेपणा वाटू लागला. २००८ साली ४९व्या वयात नीना यांनी दिल्लीतील चार्टर्ड अकाउंट विवेक मिश्रा यांच्यासोबत लग्न केले.
सूत्रांच्या माहितीनुसार विवेक विवाहित होते. पण ते आधीच विभक्त झाले होते. विवेक आणि नीना यांनी एकमेकांना ६ वर्षे डेट केलं होतं. जुलै, २००८मध्ये दोघे युएसमध्ये एक लग्न अटेंड करण्यासाठी गेले होते. तिथेच विवेक यांनी नीना यांना लग्नाची मागणी घातली. त्यानंतर त्यांनी लग्न केलं.